शिर्डीतून योगेश घोलपला शिवसेनेकडून उमेदवारी?

शिर्डीत आता बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावलीय. त्यानंतर तिथं शिवसेना उमेदवार बदलण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले होते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 24, 2014, 12:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी
शिर्डीत आता बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावलीय. त्यानंतर तिथं शिवसेना उमेदवार बदलण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले होते.
आता बबनराव घोलप यांच्याऐवजी त्यांचे पुत्र योगेश घोलप यांचे नाव चर्चेत आहेत. नाशकात उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेणार आहे.
एकूणच काय शिर्डीत बबनराव घोलप यांची उमेदवारी धोक्यात आली असली तरीही बबनराव घोलप मात्र निर्धास्त आहेत. अवाजवी संपत्तीमुळं उमेदवारी गमावली तरीही तिकीट घोलप कुटुंबातच राहण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.