www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीनं सोमवारी सांगितलं की काँग्रेस एक बुडणारं जहाज आणि आई-मुलगा (सोनिया आणि राहुल गांधी) दोघांचेही दिवस आता संपलेले आहेत.
झी न्यूज सोबत खास मुलाखतीत मोदींनी म्हटलं, "निवडणुकीच्या तारखांची जेव्हा घोषणा झाली तेव्हा काँग्रेस पक्षानं विचार केला की यावेळी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. ते म्हणतात, मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही. काँग्रेस पक्ष तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देईल. त्यांच्या वक्तव्यांवरुन असं वाटतं की ते निवडणूक आधीच हरले आहेत. आई-मुलगा दोघांचीही वेळ आता संपलीय."
आतापर्यंतच्या मतदानाला बघता काँग्रेसचं जहाज बुडत असल्याचं त्यांना जाणवलंय. त्यांच्याजवळ कोणताही अजेंडा नाहीय म्हणून ते माझ्यावर आरोप करतायेत, असंही मोदी म्हणाले.
२०१४च्या निवडणूका म्हणजे मोदी विरुद्ध इतर अशा आहेत. मात्र निव्वळ चांगलं सरकार बनवणं याबद्दलच मी बोलतोय, असं मोदी म्हणतात. शिवाय वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीच्या वेळी जो प्रतिसाद त्यांना नागरीकांना मिळाला, त्यानंतर माझ्या दृष्टीकोनात काहीही बदल झाला नसल्याचंही ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.