पक्के वैरी झाले सख्खे मित्र... आघाडीला फायदा?

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समझोता झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 11, 2014, 12:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समझोता झालाय.
चिखलीकर यांची पूर्वी विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक अशी ओळख होती.  गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे अशोक चव्हाण यांच्याशी राजकीय वैमनस्य सर्वज्ञात आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांच्यात समझोता झाला आहे.
मुख्य म्हणजे, गुरुवारी अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतरच हा समझोता झाला. त्यानंतर  आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.
चिखलीकरांची लोहा - कंधार या विधानसभा मतदारसंघात चांगली ताकद असून नांदेड आणि लातूर या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या भागात या समझोत्याचा काँग्रेस आघाडीला चांगला फायदा होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.