सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची

गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यातील अनेकांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची विषय ठरली. लालबागच्या राजाचे मुजोर कार्यकर्ते सामान्य भाविकांशी कसे वागतात? त्याचं दर्शन घडविणारी ही क्लिप होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2013, 08:21 AM IST

ww.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यातील अनेकांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची विषय ठरली. लालबागच्या राजाचे मुजोर कार्यकर्ते सामान्य भाविकांशी कसे वागतात? त्याचं दर्शन घडविणारी ही क्लिप होती.
`झी मीडिया`नं सर्वप्रथम या समस्येला वाचा फोडली. कार्यकर्त्यांच्या गैरवर्तनाची व्हिडिओ क्लिप दाखवली. त्यावरच न थांबता सर्वस्तरावर यावर चर्चा घडवून आणली. या व्हिडिओ क्लिपचा प्रसार इतक्या वेगाने झाला, की आठवड्याभराच्या आतच युट्युबवर १ लाख ७२ हजार ७७६वर हिट्स मिळाल्या आहेत. टॉप व्हिडीओ लिस्टमध्ये ही क्लिप आहे. हा आकडा सतत वाढतोच आहे. अनेक भाविकांनी या संवेदनशील विषयाचा पाठपुरावा केल्याबद्दल झी २४ तास वाहिनीचे आभार मानले.
अनेक कलाकारांनी, विचारवंतांनी या प्रश्नी आपली मते झी २४ तासच्या माध्यमातून व्यक्त केली. फेसबुक आणि www.24taas.com या वेबसाईटवरही प्रतिक्रियांचा महापूर आला. अखेर याप्रश्नाची प्रशासनालाही दखल घ्यावी लागली. गृहमंत्र्यांनी या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाईचे आदेश दिले. झी २४ तासने नेहमीच सामाजिक भान ठेवत अपप्रवृत्तींवर वार केले आहेत. हीच भूमिका यापुढेही राहील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ

व्हीआयपी दर्शन