दहा देशातील गणपतीचे दर्शन मुंबईत

लोढा फाउंडेशनच्या वतीनं एक गणेश महोत्सव भरवण्यात आला आहे. भरवण्यात आलेल्या मुंबई गणेश महोत्सवात दहा देशांतील गणरायांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन याठिकाणी गणेशभक्तांसाठी पालीचे मंदिर, हिमालयाची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी उभारण्यात आल्या आहेत.

Updated: Sep 10, 2013, 01:38 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
लोढा फाउंडेशनच्या वतीनं एक गणेश महोत्सव भरवण्यात आला आहे. भरवण्यात आलेल्या मुंबई गणेश महोत्सवात दहा देशांतील गणरायांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन याठिकाणी गणेशभक्तांसाठी पालीचे मंदिर, हिमालयाची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी उभारण्यात आल्या आहेत.
ग्रॅण्ट रोडवरच्या गिल्डर टँक ग्राऊंडवर लोढा फाऊंडेशनच्या वतीनं भरवण्यात आलेला मुंबई गणेश महोत्सव गणेशभक्तांसाठी मेजवानी देणारा असाच आहे. दहा देशांच्या गणरायासोबतच इथं पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराची हुबेहुब अशी भव्य प्रतिकृती उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे दर्शन अनेक गणेशभक्तांनी केले असले तरी मुंबईकरांना सध्या वेगवेगळ्या देशातील दहा गणपतींचे दर्शन या गणेशोत्सवात घेता येणार आहे.
मंदिरातील कोरीवकामही वाखाणण्याजोगं करण्यात आलयं. तसंच याठिकाणी गणेशभक्तांना होमहवन करण्यासाठी यज्ञमंडप घालण्यात आलाय. तसंच हिमालयाची भव्य प्रतिकृतीही गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरणारी आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. तर चीन आणि थायलंडचे राजदूतही कार्यक्रमास उपस्थित होते.
पाच विविध विषयांवरील प्रदर्शनही याठिकाणी भरवण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र देशातील फोटोंचे प्रदर्शन आहे. तसंच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही आहे. दीड एकर परिसरात उभारण्यात आलेल्या मुंबई गणेश महोत्सव अनंत चतुर्थीपर्यंत गणेशभक्तांसाठी खुला राहणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडीओ