www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील म्हाडाच्या ट्रान्झिट कँपमध्ये गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय.
‘झी मीडिया’नं ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली होती. त्याची दखल घेत राज्य शासनानं ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडलेल्या सुमारे चार हजार कुटुंबांना दिलासा दिलाय. ट्रान्झिट कँपमधल्या भाडेकरुंच्या मूळ अधिकारांवर कुठल्याही पद्धतीनं गदा येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र, या रहिवाशांना आपल्या मूळ घराचा हक्क सोडावा लागणार आहे.
म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधले रहिवासी अक्षरशः नरकयातना भोगत होते. जिथं दहा मिनिटं उभं राहिलं तरी जीव गुदमरतो तिथं गेली अनेक वर्षं दोनशे कुटुंब कसेबसे दिवस काढत आहेत. ‘झी मीडिया’नं हाच मुद्दा लावून धरला आणि अखेर इथल्या रहिवाशांना न्याय मिळाला. ‘मीडिया’च्या ज्या रिपोर्टनंतर सरकारला खडबडून जाग आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.