तटकरे प्रकरणी तपास यंत्रणांवर हायकोर्टाचे ताशेरे!

सुनील तटकरेंच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास अत्यंत बेजबाबदारपणे केल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. आर्थिक गुन्हे शाखेसह सर्वच यंत्रणांनी तपासात हलगर्जीपणा दाखवल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 2, 2013, 03:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुनील तटकरेंच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास अत्यंत बेजबाबदारपणे केल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. आर्थिक गुन्हे शाखेसह सर्वच यंत्रणांनी तपासात हलगर्जीपणा दाखवल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
एवढ्या गंभीर प्रकरणाचा तपास बिनडोकपणे झाला आहे, अशा शब्दांत या तपास यंत्रणांना फैलावर घेणार्याच खंडपीठानं नि:पक्षपातीपणे न झालेला हा तपास नको तिथं भरकटत गेलेला आहे, अशी खरमरीत टीकाही केली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी अहवालाबाबत नाराजी व्यक्त करताना या प्रकरणाच्या तपासाबाबत सरकारी यंत्रणेची असलेली अनास्था आणि उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे, असंही मत व्यक्त केलं.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३ महिन्यांत योग्य पद्धतीनं तपास पूर्ण करावा. तसंच ७ जानेवारी २०१४ पर्यंत त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश कोर्टानं दिलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.