धुळ्यात धक्कादायक घटना, वाघ कुटुंब बहिष्कृत

ज्या बहिष्कृत समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य वेचलं त्याच समाजात का कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलंय. आपल्याच समाजबांधवांनी बहिष्कृत केल्यानं सध्या हे कुटुंब दहशतीखाली जगतंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 13, 2013, 10:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
ज्या बहिष्कृत समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य वेचलं त्याच समाजात का कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलंय. आपल्याच समाजबांधवांनी बहिष्कृत केल्यानं सध्या हे कुटुंब दहशतीखाली जगतंय.
धुळे जिल्ह्यातील वेल्हाणे गावातलं वाघ कुटुंब. गेल्या अनेक दिवसांपासून हे कुटुंब दहशतीखाली जगतंय. समाजात पुढारी म्हणवून घेणा-या लोकांनीच त्यांच्यावर बहिष्कार टाकला. वाघ यांनी गावात झालेल्या दंगलीत सहभागी होण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर हा बहिष्कार टाकण्यात आलाय.
गेल्या अनेक महिन्यांपासून या बहिष्काराला तोंड देणा-या वाघ यांनी अखेर समाजातील लोटन वाघ यांच्या विरोधत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोटण वाघ यांची दरशत इतकी आहे की ते मधुकर यांचा कधी घात करतील याचा अंदाज नसल्यानं मधुकर वाघ यांचं कुटुंब दशतीखली जगतंय. अशात कोणाचीही मदत मिळणार नसल्यानं त्यांना शेतात जातानाही संपूर्ण कुटुंब सोबत घेऊन जावं लागतंय.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटकही करण्यात आलीय. विशेष म्हणजे या निरपराध कुटुंबाच्या रक्षासाठी अजून कुठलीही सामाजीक अथवा राजकीय संघटना उभी राहिली नाही. फुले शाहू आंबडरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात, अशी घटना घडावी हे राज्याचं दुर्दैवच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.