वस्तीगृहात विद्यार्थ्यांचे हाल

रत्नागिरी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहन कराव्या लागणा-या हालअपेष्टा झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना एका वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही. प्यायलाही दुषित पाणी...दोन वर्ष या मुलांना कोणताही भत्ता मिळालेला नाही...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2013, 09:35 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहन कराव्या लागणा-या हालअपेष्टा झी 24 तासच्या कॅमे-यात कैद झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना एका वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही. प्यायलाही दुषित पाणी...दोन वर्ष या मुलांना कोणताही भत्ता मिळालेला नाही...झी 24 तासची टीम जेव्हा या वसतीगृहात पोहोचली तेव्हा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अर्थातच त्यांना आपल्या चुका मान्य कराव्या लागल्या.
शासनाकडून या वसतीगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे..आणि इथे थोडे थोडके नाही तर सुमारे 150 विद्यार्थी राहतात...झी 24 तासला याबद्दल माहिती मिळाल्यावर आमच्या टीमने तिथे भेट दिली...आणि हा सगळा संताप आणणारा प्रकार कॅमे-यात टिपला..तेव्हा विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला...इथल्या मुला-मुलींना दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ताही लागू आहे. पण गेल्या दोन वर्षात या मुला-मुलींना एकही रुपया मिळालेला नाही...
झी 24 तासची टीम वसतीगृहात चित्रिकरण करत असताना अधिकारी तिथे दाखल झाले आणि हे सगळं पाहून त्यांची भंबेरी उडाली...एका अधिका-याला तर हा सगळा प्रकार पाहून भोवळच आली. पण मुलींनी न घाबरता त्यांच्या व्यथा झी 24 तासकडे मांडल्या...

या प्रकाराची आता सगळीकडे वाच्यता होईल या भीतीने सहाय्यक अधिकारी आर.जी डोळस यांनी सर्व चुका मान्य करत, वसतीगृहात कारभारात तात्काळ सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं. झी 24 तासने हा सगळा संतापजनक प्रकार उघडकीस आणल्यानंतर तरी आता लवकरात लवकर सुधारणा होणं अपेक्षित आहे...