रेकॉर्डब्रेक पाऊस...

पृथ्वीवर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तीन ठिकाणांपैकी एक आहे भारतातील चेरापुंजी... चेरापुंजीत रेकॉर्डब्रेक पाऊस पडतो आणि त्याची नोंद गिनीजबुकात झाली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 8, 2013, 12:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पृथ्वीवर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तीन ठिकाणांपैकी एक आहे भारतातील चेरापुंजी... चेरापुंजीत रेकॉर्डब्रेक पाऊस पडतो आणि त्याची नोंद गिनीजबुकात झाली आहे.
चेरापुंजी
चेरापुंजी... पृथ्वीवर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक... जगातील सर्वाधिक पाऊसाचा विक्रमही चेरापुंजीच्या नावावर आहे. इथं तब्बल २६,४६१ मीमी पावसाची नोंद झालीय. १ ऑगस्ट १८६० ते ३१ जुलै १८६१ या १२ महिन्यात हा विक्रमी पाऊस पडला होता. मेघालयातील पूर्व खाशी हिल जिल्ह्यात चेरापुंजी वसलं असून जगाच्या नकाशावर चेरापुंजीने आपली ओळख निर्माण केलीय. चेरापुंजीत दरवर्षी सरासरी ११,७७७ मीमी पाऊस पडतो. चेरापुंजीला मेघराजानं जणू वरदानच दिलंय. दक्षिण -पश्चिम आणि उत्तरपूर्व असे दोन्ही दिशाने येणारे वारे खाशी हिलकडं येतात आणि त्याचा परिणाम इथं पावसाच्या रुपाने पहायला मिळतो. हिवाळ्यात उत्तरपूर्वेकडून पाऊस येतो. इथल्या पावासची नोंद गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
चेरापुंजीतील पावसाने दोन वेळा जगात सर्वाधिक पावसाचा विक्रम नोंदवला आहे. चेरापुंजीच्या पावसाचं रहस्य हे बंगालच्या खाडीतून येणाऱ्या मान्सूनमध्ये दडलं आहे. मान्सून दरम्यान बांग्लादेशाकडून येणारे ढग हे खासी हिलवर येवून धडकतात. इथल्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात इथं पाऊस प़डतो. मान्सून काळात हवेतील आद्रतेचं प्रमाण वाढतं. इथल्या पावसाचं वैशिष्ट्ये म्हणजे इथं शकतो सकाळी पाऊस पडतो. सामान्यता ब्रम्हपूत्रा खोऱ्यातून वारा हा पूर्वेकडून येतो परंतू मेघालयात दक्षिणेकडून मान्सून दाखल होतो. या दोन्ही दिशेनं येणारे ढग हे खाली डोंगराच्या खोऱ्यात अडकतात आणि त्यामुळेच इथं विक्रमी पाऊस पडतो. जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीची लोकसंख्या दहा हजार असून इथं राहणारे लोक ‘खासीस’ म्हणून ओळखले जातात. या प्रदेशानं आजही मातृसत्ताक संस्कृती जपली असून कुटुंबातील सर्वात धाकट्या मुलीच्या पतीला लग्नानंतर पत्नीच्या घरी कायमचं राहण्यासाठी जावं लागतं. तसेच मुलांच्या नावासमोर पित्याऐवजी आईचं अडनाव लावलं जातं. चेरापुंजीनं अनोखी संस्कृती जपली असून मेघराजाचंही त्यांना वरदान लाभलं आहे.

माऊंट वाईलीएली
चेरापुंजी प्रमाणेच पृथ्वीवर आणखी एक ठिकाण आहे जिथं रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतो. हवाई बेटावरील ‘माऊंट वाईलीएली’ हा एक असा प्रदेश आहे जिथं वर्षभर तुफान पाऊस पडतो. जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशांपैकी हा एक प्रदेश आहे. ज्वालामुखीतून माऊंट वाइलीएली तयार झाला असून हवाई बेटावरील हा सर्वात उंच भूगाग आहे.
या परिसरात सरासरी ११,५०० मीमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद असून १९८२मध्ये इथं पावसाने सगळे विक्रम मो़डले होते. १९८२मध्ये वाइलीएलीमध्ये तब्बल १७,३०० मीमी पावसाची नोंद झालीय.
हा परिसर म्हणजे जणू पावसाचं माहेरघर असून या विक्रमी पावसामुळेच जगातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून या प्रदेशाला ओळख मिळाली आहे. वाइलीएलीमध्ये उष्णकटीबंधीय वर्षावनप्रमाणे वातावरण असून इथं सतत पाऊस पडतो. इथं सतत पडणाऱ्या पावसामुळेच हे एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालं आहे. इथं पडणाऱ्या विक्रमी पावसामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. हवाई बेटाच्या उत्तरेकडील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे हिवाळ्यातही इथं पाऊस पडतो. तसेच या प्रदेशाचा शंखाकृती आकारही त्याला कारणीभूत आहे. हवेत मोठ्या प्रमाणात असेल्या आद्रतेमुळे इथं विक्रमी पाऊस पडतो. इथलं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असचं आहे. या डोंगराला चोहोबाजूंनी धबधब्यांनी अक्षरश: गराडा घातला आहे. उंच कड्यावरून खाली झेपावणारं पाणी लक्ष्यवेधून घेतं. इथलं जंगल मनावर मोहिनी घालणारं आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे इथलं जंगल सदाहरीत असून नजर जाईल तिथपर्यंत हिरवीकंच वनराई दृष्टीस पडते. हा परिसर म्हणजे निसर्गाचं अनोख रुपचं म्हणावं लागेल.

टुटुनेंडोचा पाऊस...
कोलंबियातील टुटुनेंडोचा पाऊस... १९७४ साली इथं २६,३०३ मीमी पाऊस नोंद झाली होती. जगातील सर्वधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशापैंकी हा एक प्रदेश आहे. निसर्गाने या प्रदेशालाच्या झोळीतही पावसाचं वरदान टाकलंय. जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक...

पृथ्वीवर ज्या तीन ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो त्यापैकी ‘टुटुनेंडो’ हे एक ठिकाण आहे. कोलंबियाच्या पश्चिमेला टुटु