गोड शीतपेयाची कटू कहाणी !

केवळ सरबत, ज्यूसमुळे तुमचं आरोग्य धोक्यात आहे असं नाही तर भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सही विविध आजारांना निमंत्रण देवू शकतात.

Updated: Apr 23, 2013, 01:49 PM IST

www.24taas.com, मुंबई
रस्त्यावर विकली जात आहेत विविध शीतपेयं !
शीतपेयांमुळे मिळेल रोगांना निमंत्रण !
शीतपेय का बनताहेत आरोग्याला घातक !
गोड शीतपेयाची कटू कहाणी !

केवळ सरबत, ज्यूसमुळे तुमचं आरोग्य धोक्यात आहे असं नाही तर भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सही विविध आजारांना निमंत्रण देवू शकतात.. उन्हाळ्यात भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सची विक्री केली जाते...विशेष म्हणजे ब्रँन्डेड कोल्ड्रिंक्सच्या बाटलीतून हे भोसळयुक्त शीतपेय विकलं जातं... कोल्ड्रिंक्स, सॉफ्टड्रिंक्स, ज्यांना बोलीभाषेत थंडा म्हटलं जातं...खरं तर लोक बाराहीमहिने कोल्ड्रिंक्सचा अस्वाद घेतात..मात्र उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सचा मोह आवरण जरा कठीणंच असतं...तहान भागविण्यासाठी लोक पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्स पितात...पण आपण पित असलेलं कोल्ड्रिंक्स खरंच ब्रँन्डेड कंपनीचं आहे का ? याकडं कोणी लक्ष देत नाही..आणि त्याचाच गैरफायदा शितपेय विक्रेत्यांकडून घेतला जातो...
उन्हाळ्यात ब्रँन्डेड कंपनीच्या बाटलीतून भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सची विक्री केली जाते..या कोल्ड्रिंक्समुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते..या थंडगार बाटलीत दडलंय जीवघेण्या धंद्याचा रहस्य...जानकारांच्या म्हणण्यानुसार सॉफ्टड्रिंक्समध्ये जवळपास ९९ टक्के पाणी असतं...पण ते पाणी जर असं असेल तर...पण हेच सत्य आहे...अशा प्रकारे ब्रँन्डेड कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यातून भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स विकण्याचे प्रकार प्रत्येक उन्हाळ्यात उडकीस येतात..भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स तयार करण्यासाठी वापरलं जाणारं पाणी जनावरांनाही पिण्या लायक नाही..पण हे कोल्ड्रिंक्स तयार करणा-यांना त्याची जराही परवा नाही...अशा प्रकारच्या कोल्ड्रिंक्समध्ये लिंडेन, कॅफिन,सॅक्रिन,फॉस्फरिक एसिड,सोडा,इथिनिल ग्लायको,ऑरसेनिक या पदार्थांचा वापर केला जातो..

हे पदार्थ वापरण्यामागे कोल्ड्रिंक्स तयार करणा-यांचा वेगळाच उद्देश असतो.. लिंडेनचा वापर केल्यामुळे कोल्ड्रिंक्सला रंग येतो तसेच पाण्याची दुर्गंधी नष्ट होते... कॅफिनमुळे कोल्ड्रिंक्स पिणा-याला तरतरी येतेतसेच लहान मुलांना त्याची सवय लागते.. सॅक्रिनमुळे कोल्ड्रिंक्सची गोडी वाढते.. फॉस्फोरिक एसिडमुळे कोल्ड्रिंक्सची लज्जत वाढते...या सगळ्या पदार्थांमुळे अगदी कमी किंमतीत हे भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स तयार होतं... भेसळयुक्त कोल्ड्रिंक्स तयार करण्यासाठी केवळ एक ते दिड रुपया खर्च येतो..मात्र त्याची विक्री ५ ते ६ रुपयांत केली जाते...त्यामुळे प्रत्येक बाटलीमागे त्यांना ४ ते ५ रुपये नफा मिळतो..
उन्हाळ्यात ठिकठिकाणी असे कोल्ड्रिंक्स विक्रेते तुम्हाला पहायला मिळतील..तेव्हा कोल्ड्रिंक्स पितांना त्याची खात्री करुन घ्या... उन्हाळ्यात आंबा विक्रीसाठी येतो...आणि त्यामुळेच मँगो ज्यूसची विक्री होते...पण पाच- दहा रुपयांना मिळणारा तो मँगो ज्यूस खरंच आंब्यापासून तयार केलेला असतो का ? याचा कधी तुम्ही विचार केलाय...आज आम्ही तुम्हाला या ज्यूसचं सत्य दाखवणार आहोत.. लिंबू सरबत... मँगो ज्यूस..पायनॅपल ज्यूस... असे विविध प्रकारच्या सरतबतांचे स्टॉल ठिकठिकाणी पहायला मिळतील..कारण उन्हाळा असल्यामुळे अशा सरबतांची मोठ्या प्रमाणात विक्री होते...लोक तहान भागविण्यासाठी रस्त्याच्याकडेला विकल्या जाणा-या अशा शितपेयांचा आधार घेतात..पण हे सरबत पिणा-यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते.
लोक उन्हाळ्यात मँगो ज्यूस मोठ्या आवडीने पितात..पण तो ज्यूस खरंच आंब्याच्या रसापासून तयार केला आहे का ? याची कोणी विचारणा करत नाही...अनेक स्टॉलवर केवळ ग्राहकांना दिसावं म्हणून आंबे ठेवले जातात...मात्र प्रत्येक्षात ज्यूस हा आंब्याच्या पल्पपासून तयार केला जातो...तिथं स्वच्छतेचा अभाव असतो...मँगो ज्यूसच्या ज्यूसरवर माशांचं साम्रज्य असतं...बर्फही निकृष्ठ दर्जाचा वापला जातो..
ज्या भांड्यात ज्यूसचे ग्लास धुतले जातात ते पाणी वारंवार बदलण्याची आवश्यकता असते...पण त्याकडं लक्ष्य दिलं जात नाही... कळकट्ट पाण्यात ग्लास धुतले जातात...हीच अवस्था लिंबू सरबत आणि ऊसाच्या रसाबाबतीत दिसून येते...लिंबाच्या फ्लेवरचा वापर करुन लिंबू सरबत केलं जातं....बर्फामुळे थंडगार झालेलं लिंबू सरबत पिणा-याला तृप्तीचा आनंद देतं..मात्र त्यात लिंबाचा फ्लेवर आणि सॅक्रिनचा वापर केला जातो...याची ग्राहकांनी कल्पना नसते...मात्र काही दिवसांनी त्यांना आरोग्याच्या तक्रारी