www.24taas.com, झी मीडिया, पॅरीस
जगातील सर्वात गुढ हास्याचं रहस्य लवकरच उलगडणार आहे..लियोनार्डो दा विंचीची जगप्रसिद्ध पेटिंग मोनालिसा खऱंच वास्तवात होती कि, ती लियोनार्डोची एक केवळ कल्पना होती ?याचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांनी इटलीतील मलमलचे व्यापारी फ्रान्सिस्को डेल गियोकोंडोच्या कुटुंबाचं थडगं खोदलंय..
मोनालिसाच्या स्मितहास्याचं काय आहे गूढ ?
५०० वर्षांपूर्वी खरंच होती मोनानिसा ?
की ,लियोनार्डो दा विंचीच्या कल्पनेतील पेंटिंग ?
जगातील बहुचर्चीत हास्याचं उलगडणार गूढ !
३०० वर्षापूर्वीच्या थडग्यात मिळाले पुरावे !
मोनालिसाच्या स्मितहास्याचं उलगडणार गूढ !
होय..जगातील बहुचर्चीत हास्यामागचं गुढ लवकरच उलगडणार आहे... वैज्ञानिकांना लवकरच या हास्यामागच्या कारणाचा शोध लागणार आहे.. इटलीच्या फ्लोरेन्स शहरात लीसा गेरार्डिनी डेल गियोकोंडोच्या कुटुंबाचे थडगे असून शुक्रवारी वैज्ञानिकांनी ते थडगे खोदले...या थडग्यातून मिळालेल्या तीन अस्थींपैकी एक लीसाच्या मुलाची असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलीय.
“आम्ही सॅटिस्समा एनुंजियाटा बॅसिलिकाच्या खाली असलेल्या गियोकोंडो कुटुंबाचे थडगे तीनशे वर्षानंतर प्रथमच खोदले..ऐतिहासिक कागदपत्रांनुसार या थडग्यात फ्रान्सिको डे गियोकोंडो व्यतिरिक्त कमीत कमीत त्यांच्या एका मुलाच्या अस्थी असण्याची शक्यता आहे..सेंट ऑर्सोला कॉन्व्हेंटमध्ये आढळून आलेल्या ८ आवशेषांपैकी तीन आवशेषांशी डीएनएची तुलना केली जाऊ शकते” असं संशोधकांनी सांगितलं
लीसा गियोकोंडो कुटुंबातील थडग्यांच्यामध्यमातून वैज्ञानिक मोनालिसाचं रहस्य कसं काय उलगडणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल..पण लियोनार्डो दा विंचीची जगविख्यात पेंटिग मोनालिसालीसाची मॉ़डेल होती प्रसिद्ध मलमल व्यापारी फ्रान्सिस्को डेल गियोकोंडोची पत्नी लीसा गेरार्डिना डेल...मुलाच्या डीएनएशी लीसाचे डीएनए मॅच होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केलीय..फ्लोरेंस शहरातील सेंट ऑर्सोला कॉन्वेंटमध्ये १५व्या शतकातील काही महत्वाचे अवशेष वैज्ञानिकांच्या हाती लागल्यामुळे लियोनार्डोच्या मॉडेलचा शोध घेणा-यांच्या आशा बळावल्या आहेत..त्यापैकी एक आवशेष हा लीसा गियोकोंडोचा असवा असं वैज्ञानिकांना वाटतंय..कारण लीसाने आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ कॉन्व्हेंटमध्ये काढला होता..
“लीसाचं निधन १४ जुलै १५४२मध्ये झालं होतं..जर सेंट ऑर्सोलामध्ये आढळून आलेल्या मानवी सापळ्याचा कालखंड जुळला तर आम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डीएनएची तुलना करता येईल..तसेच माय-लेकरांच्या डीएनएतून मोनालिसा खरंच वास्तवात होती की नव्हती याचा उलगडा होणार आहे” असं संशोधकांनी सांगितलं
पॅरिसच्या जगप्रसिद्ध संग्रहालयातील मोनालिसाची ही पेंटिंग जगभरातील लोकांसाठी गुढ बनून राहिली आहे..वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार १५०३ ते १५०६ या कालखंडात मोनालिसाची ही पेंटिंग तयार करण्यात आली असावी..पण आता लवकरच मोनालिसाच्या स्मित हास्याचं रहस्य उलगडणार आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.