आठवणीतले राजीव

राजीव गांधी... एक अशी व्यक्ती... ज्या व्यक्तीच्या बरोबर देशाची राजकिय भवितव्यही जोडल गेल होत.. त्यांना ठावूक नव्हतं की आपल्या हातून नियती नेमकं काय करुन घेणार आहे ते

Updated: Aug 20, 2012, 11:13 PM IST

कसा झाला पायलट ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास ?
राजकारणापासून का दूर होते राजीव गांधी ?
काय होतं राजीव गांधींचं स्वप्न ?
आठवणीतले राजीव
राजीव गांधी... एक अशी व्यक्ती... ज्या व्यक्तीच्या बरोबर देशाची राजकिय भवितव्यही जोडल गेल होत.. त्यांना ठावूक नव्हतं की आपल्या हातून नियती नेमकं काय करुन घेणार आहे ते....राजीव गांधी राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते पण राजकारण मात्र त्यांचा पिछा सोडायला तयार नव्हतं.. इंदिरा गांधींच्या निधनामुळे राजीव गांधींवर अचानकपणे मोठी जबाबदारी येवून पडली होती.... इंदिरा गांधींवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची खबर मिळताच राजीव गांधी पश्चिम बंगालहून दिल्लीत दाखल झाले..दिल्लीच्या एम्स रुग्णालयात इंदिरा गांधींचं पार्थीव ठेवण्यात आलं होतं..राजीव गांधी दिल्लीत पोहोचताच त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गराडा घातला...त्यावेळी सोनिया गांधीही त्यांच्या सोबत होत्या...काँग्रेसच्या संसदीय दलाचा नेता म्हणून राजीव गांधींची निवड करण्यात आल्याचं त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधींना सांगितलं होतं. इंदिरा गांधींच्या निधनामुळे सोनिया गांधींना मोठा धक्का बसला होता....
राजीव गांधी त्यावेळी सोनियांना समजावण्याच्या प्रयत्न करत होते... माझ्या आईनं पंतप्रधान व्हावं असं असंख्य लोकांना वाटतंय. पण तसं होऊ नये अशी मी आशा करतो.कारण राजकारणामुळे त्यांचा घात होईल अशी मला भीती वाटतेय. अशीच काहीशी भिती त्यावेळी सोनिया गांधींनाही सतावू लागली होती...राजीव गांधी आपल्या आईला पंतप्रधान होण्यापासून रोखू शकले नाहीत त्याच प्रमाणे सोनिया गांधीही राजीव गांधींना देशाची सूत्र हाती घेण्यापासून रोखू शकल्या नाहीत..आपल्या आईचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच राजीव गांधींनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. भारतीय राजकारणावर राजीव गांधींनी आपला वेगळा ठसा उमटवलाय...
त्यांच्या राजकारणावर नेहरु - गांधी घराण्याची छाप होती..राजीव गांधींना हा वारसा ज्यांच्याकडून मिळाला होता त्या व्यक्ती भारताच्या राजकारणातील दिग्गज व्यक्ती होत्या. 15 ऑगस्ट १९४८.... जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून तिरंगा फडवात होते त्याचवेळी लाल किल्ल्यापासून काही अंतरावर असलेल्या कश्मीरी गेटावर त्यांचा नातू राजीवरत्न गांधी यांच्या हातात झेंड्याची दोरी होती.. चार वर्ष वयाच्या राजीवसाठी बहुतेक सत्तेचा हा पहिलाच अनुभव असेल..पण पुढे राजीव गांधींनी सत्तेपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न केला.. १९४४मध्ये मुंबईत जन्मलेल्या राजीव गांधींसाठी जीवन एखाद्या सुंदर स्वप्नापेक्षा काही कमी नव्हतं..

सरोजनी नायडूंचे पत्र
माझ्या प्रिय राजीव, दिवाळीच्या या प्रसंगी तुझ्यासाठी शुभेच्छाचा एक असा दिप प्रज्वलीत केलाय कि, ज्याला कुठलही वादळ विझवू शकणार नाही. तुला एका उज्वल पंरपरा आणि वारसा लाभला आहे. या पुढे अवघं विश्व हे तुझ्यासाठी एक देश असेल, आणि मानवता हेच तुझं घर असेल.
सरोजीनी नायडूंच्या या पत्रातील प्रत्येक शब्द ना शब्द राजीव गांधींनी जणू आपल्या आचरणात आणला होता..तसेच आजोबांसोबत ग्लायडिंग क्लबमध्ये गेल्यानंतर आकाशाला गवसणी घालण्याच्या त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले होते....त्यामुळेच शाळेत ठेवलेलं हे विमान त्यांचा जणू मित्रच बनलं होतं... दून स्कूलमध्ये शिकणारा हा लाजाळू मुलगा आता मोठा झाला होता...मुलाने भारतातचं रहावं असं इंदिरा गांधींना वाटत होतं...पण राजीव गांधींच्या मनात काहीच होतं..१९६२च्या ऑक्टोबर महिन्यात राजीव गांधींना घेऊन इंदिरा गांधी केम्ब्रिज विद्यापिठात दाखल झाल्या..त्यानंतर ऑगस्ट महिन्यात राजीव गांधींनी केम्ब्रीजची परिक्षा पास झाले...

इंदिराजींचे पत्र

एका आईसाठी हा क्षण खुप हळवा असतो , ज्यावेळी तिचा मुलगा एक मोठा ..
तो आता तिच्यावर अवलंबून नसतो...
यापुढे तो जे काही करेल ते दृष्टीस पडणार नाही
नवीन मित्र होतील ,नवीन संबध होतील आणि नव प्रेमही होईल
राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना पुढचे चार वर्ष एकत्र राहण्याचा क्वचित योग आला असेल....राजीव गांधी एका वेगळ्या विश्वात रमले होते..नवं कॉलेज ...नवा अभ्यासक्रम... नवीन मित्र... आणि एक सेकंडहॅन्ड कार...असं त्यांच विश्व होतं..आपण भारतातील एका मोठ्या राजकीय घरण्याशी संबंधीत आहोत