प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही : अमिताभ

प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही, असे उद्गार मुंबईतल्या एका कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी काढले. त्यांनी मराठमोळं भाषण केले. मुंबई-महाराष्ट्रानं मला भरभरुन दिल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.

Updated: Jun 17, 2015, 08:42 PM IST
प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही : अमिताभ  title=

मुंबई : प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही, असे उद्गार मुंबईतल्या एका कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी काढले. त्यांनी मराठमोळं भाषण केले. मुंबई-महाराष्ट्रानं मला भरभरुन दिल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.

बिग बी अमिताभ बच्चन यांना मराठीत बोलताना कधी ऐकलंय का ? तर याचं उत्तर नाहीच असेल. मात्र, मुंबईकरांना अमिताभ बच्चन यांचा मराठी बाणा पाहायला मिळाला. मला मराठी येतं चांगलं बोलत येत नाही, असं म्हणत त्यांनी थेट भाषणाला मराठीतून सुरुवात केली. 

मला मुंबई आणि महाराष्ट्रानं भरभरुन दिल्याचं त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलं. व्ही. शांताराम आणि विवेक समूह यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील चित्रपटांची सूची असलेल्या शतकमोहत्सवी मराठी चित्रसंपदा या ग्रंथाचं प्रकाश झालं त्यावेळी त्यांनी मराठीतून भाषण केलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.