डहाणूत जन्माला आले एक अजब बाळ

पालघर जिल्हातील डहाणू तालुक्यातील सायवन जवळील चळणी गावत जन्माला आलेल्या बाळाला पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करीत असून अजबरित्या जन्माला

Updated: Jun 13, 2015, 09:38 PM IST
डहाणूत जन्माला आले एक अजब बाळ title=

हर्षद पाटील, पालघर : पालघर जिल्हातील डहाणू तालुक्यातील सायवन जवळील चळणी गावत जन्माला आलेल्या बाळाला पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करीत असून अजबरित्या जन्माला आलेले बाळ सर्वांच्या कुतुहलाचा विषय बनलाय.

डहाणूमधील चळणी गावात एक लहान बाळ एका वेगळ्या आजारापासून त्रस्त आहे. त्याला तेरा दिवस  झाले आहेत. सातव्या महिन्यात जन्मलेल्या या बाळाचं वजन फक्त ८०० ग्रॅम असून त्याची उंची अर्धा फूट आहे. शिवाय या बाळाला जन्म देणारी आई त्याला आपल्या जवळही येऊ देत नाही. तसेच त्याला आपलं दूधही पाजत नाही.

 चळणी गावात  एक लहान बाळ अजब आजारापासून त्रस्त असून त्याला तेरा दिवस  झाले आहेत. या बाळाची शरिरीक रचना बघून त्याला लोक काही जादू किंव्हा  'पा' म्हणून बोलवत आहेत. सात महिन्यात जन्मलेल्या या बाळाचे वजन फक्त ८०० ग्रँम असून त्याची उंची अर्धा फूट आहे. 

दरम्यान, या बाळाला जन्म देणारी आई त्याला आपल्याजवळ येऊ देत नाही. तसेच  त्याला आपले दूधही पाजत नाही.  बाळाचे आजोबा जन्मापासून त्याला बकरीचे दूध पाजत असून ते या  बाळाचे संगोपन करीत आहेत. बाळाचा चेहरा एक वृद्ध मानसा दिसतोय.

ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या बाळाचा जन्म झाला आहे तेथील डॉक्टरही बाळांला बघून अचंबित झालेत. शिवाय या बाळाला कुठला आजार आहे हे पाहण्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील, असंही  डॉक्टर यांनी सांगितले. दरम्यान या बाळाला पाहण्यासाठी नागरीकांची एकच रिघ लागली आहे.

पाहा व्हिडिओ

वाडिया हॉस्पिटलनं मदतीचा हात 
पालघरमधील या रहस्यमयी बाळाला मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलनं मदतीचा हात दिलाय. वाडिया हॉस्पिटलनं बाळावर मोफत उपचाराची तयारी दर्शवलीय. झी 24 तासवर याबाबतच वृत्त प्रसारित होताच वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी ही घोषणा केलीय.

या बाळावर काही टेस्ट करण्याची गरज असल्याचं डॉ. मिनी यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं. त्यामुळं बाळाच्या या टेस्ट आणि उपचार मोफत करण्याची घोषणा त्यांनी केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.