नाथ्रा ते नवी दिल्ली... मुंडेंचा प्रवास

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठे नेते गोपीनाथ मुंडे यांचं कार अपघातानंतर बसलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालंय... एक नजर टाकुयात त्यांच्या कारकिर्दिवर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 3, 2014, 11:43 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठे नेते गोपीनाथ मुंडे यांचं कार अपघातानंतर बसलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालंय... नाथ्रा या बीड जिल्हातील लहान गावापासून सुरु झालेला गोपीनाथ मुंडे यांचा प्रवास अकाली संपला आहे...

मुंडेंचा राजकीय प्रवास
* 1969 - बीडच्या कॉलेजमध्ये सीआरची निवडणूक लढवली
* 1970 - अभाविपचे काम सुरु
* 1978 - विधानसभा निवडणुकीत पराभव
* 1978 - बीड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य
* 1980 - पहिल्यांदा रेणापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली
* 1980 - भाजयुमोचे पहिले अध्यक्ष
* 1982 - प्रदेश भाजपचे सरचिटणीस
* 1985 - गेवराई मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पराभव
* 1985- बीड लोकसभा मतदारसंघात पराभव
* 1986 - भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
* 1987- शेतक-यांच्या प्रश्नांवर कर्जमुक्ती मोर्चा
* 1990 - विधानसभा निवडणुकीत भाजपचे 42 आमदार विजयी
* 1992-95 – विधानसभेत विरोधी पक्षनेते
* 1994-95 - तत्कालिन काँग्रेस सरकारविरूद्ध संघर्ष यात्रा
* 1995- मार्च 1999 - युती सरकारमध्ये महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भूषवलं.
* 2009 – बीडमधून लोकसभा निवडणूक जिंकले
* 2009 - महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी
* 2009 - लोकसभेतील भाजपचे उपनेते
* 2013 - भाजप केंद्रीय निवडणूक समितीत समावेश
* 2014 - पुन्हा बीडचे खासदार, केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री

नाथ्रा ते नवी दिल्ली...
* मराठवाड्यात जन्मलेलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळीत 12 डिसेंबर 1949 रोजी झाला.
* वडिलांचं नाव पांडुरंगराव मुंडे आणि आईचं नाव लिंबाबाई मुंडे
* घरात होते वारकरी वातावरण
* संघर्ष करत बीड आणि नंतर पुढे येथे शिक्षण
* बीडमध्ये असतांना संघ आणि भाजपच्या संपर्कात प्रभाव
* आणिबाणीला विरोध करत प्रमोद महाजनांसह कारावास भोगला
* पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण
* शिकत असतांनाच विविध आंदोलनांमध्ये सहभाग
* गावपातळीपासून दिल्लीपर्यंत लोकसंपर्क असलेला नेता
* मुंडे यांचे मेहुणे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांनीच महाराष्ट्रात पक्ष पुढे नेण्याचं काम जोमाने केलं.
* नाथ्रा ते नवी दिल्ली हा प्रवास स्वकर्तृत्वावर केला

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.