Google नं ‘शोमॅन’ला समर्पित केलं Doodle

गूगलनं भारतीय सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आजचं ‘डूडल’ त्यांना समर्पित केलंय. गूगलनं ‘डूडल’मध्ये राज कपूर यांची मोस्ट आयकॉनिक फोटो म्हणजे त्यांची ब्लॉकबस्टर फिल्म ‘श्री४२०’चं पूर्ण पोस्टरला जागा दिलीय. श्री४२० चित्रपट १९५५मध्ये रिलीज झाला होता. यात राज कपूर यांची हिरोइन नर्गिस होती. 

Updated: Dec 14, 2014, 01:56 PM IST
Google नं ‘शोमॅन’ला समर्पित केलं Doodle title=

मुंबई: गूगलनं भारतीय सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आजचं ‘डूडल’ त्यांना समर्पित केलंय. गूगलनं ‘डूडल’मध्ये राज कपूर यांची मोस्ट आयकॉनिक फोटो म्हणजे त्यांची ब्लॉकबस्टर फिल्म ‘श्री४२०’चं पूर्ण पोस्टरला जागा दिलीय. श्री४२० चित्रपट १९५५मध्ये रिलीज झाला होता. यात राज कपूर यांची हिरोइन नर्गिस होती. 

‘डूडल’ वर राज कपूर यांचा जो फोटो दाखवला गेलाय, तो फोटो ‘श्री४२०’चा आहे. याशिवाय बॅकग्राऊंडमध्ये आणखी एक फोटो आहे. ज्यात राजकपूर आणि नर्गिस दोघं छत्रीत आहेत. ‘श्री४२०’मध्ये राज कपूर यांच्या भूमिकेचं नावही राज आहे. 

राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ला पेशावर (पाकिस्तान)मध्ये झाला होता. राज कपूर यांची चित्रपटातील अनेक गाणी हीट झाली. ज्यात   'मेरा जूता है जापानी' (श्री 420), 'आवारा हूं' (आवारा), 'जीना यहां, मरना यहां' (मेरा नाम जोकर) हे खूप प्रसिद्ध झाले. त्यांचं निधन १९८८मध्ये झालं तेव्हा त्यांचं वय ६३ होतं.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.