www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महानगरपालिकेने चक्क विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक्सपायर्ड मेडिसीन असल्याचं आढळून आलंय. गोवंडीतल्या शिवाजीनगर भागात लोटस कॉलनी शाळा नं 4, शिवाजीनगर मराठी शाळा या शाळामध्ये ऑक्टोबर 2008 चे प्राथमिक उपचार पेटी आहे. तर त्यातली औषधं ही गेल्या काही वर्षापासून बदललीच गेली नाहीत.
शिवाजी नगर मराठी शाळेत प्राथमिक उपचार पेटीत हे बेक्टोलॉन अँटीसेप्टीक लिक्वीड पहायला मिळालं जे एप्रिल 2010 मध्येच एक्सपायर झालं आहे. बर्नकेअर क्रिम जे मार्च 2010 मध्येएक्सपायर झालं आहे. सोडिअम बायकर्बोनेट आय.पी. पावडर जुलै 2011 मध्येच एक्सपायर झाली आहे. कम्पाउंड बेनझॉइन टींक्चर आयपी डिसेंबर 2011 मध्येच एक्सपायर झाली आहे. इतकंच काय तर साधं डेटॉलही एक्सपायर डेटच आहे..
त्यानंतर लोटस कॉलनी शाळा क्र 4 मध्ये गेलो तिथली पेटी देखिल 2008 चीच आहे..त्यातलं लिक्विड सोल्यूशन जून 2010 मध्ये एक्सपायर झालंय तर इतरही औषधं गेली वर्षानुवर्षं बदलली नाहीत. शिवाजी नगर उर्दु शाळेत तर प्राथमिक उपचार पेटीच उपलब्ध नव्हती तिथल्या एका बाईंना आम्ही विचारले तर बीएमसीकडेच औषधं नसल्याचं त्यांनी सांगितले.
फक्त औषधंच नाही तर अग्निशमन नळकांडीतलं गॅसही 2010 पासून एक्सपायर झालेलं आहे..त्या गॅस भरुन घेण्याची तसदी इथल्या मुख्याध्यापक, शिक्षण अधिका-यांनी घेतली नाही..त्यामुळे उद्या जर बीएमसी शाळेला आग लागली तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा...
हे चित्र केवळ दोन शाळांचं आहे..मुंबईतल्या 1174 शाळंची काय परिस्थिती असेल याचा अंदाज येऊ शकतो..शाळातल्या या त्रुटींना पालिकेने सर्वे करण्याची परवानगी दिलेल्या अपनालय या संस्थेने दुजारा दिलाय.
प्रत्येक महिन्याला बीट ऑफिसरने शाळांची पाहणी करुन त्यातल्या त्रुटी संबंधित शिक्षण अधिका-यांना कळवणं अपेक्षित असतं पण ही पाहणी केली जाते का ?
होत असेल तर शाळांची ही दुरावस्था कशी ?
व्हर्च्युअर क्लासची स्वप्न पाहणा-या उद्धव ठाकरेंना ही रिअलीटी दिसत नाही का?
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खळण्याचा अधिकार यांनी दिला कुणी?
काय करतायत शिक्षण अधिकारी ?
संबंधित अधिका-यांवर कारावाई होणार का?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.