www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉकयार्डमधली बाबू गेनू मंडई इमारतीमधून बारा तासानंतर एका कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. हा कुत्रा ढिगा-याखाली बारा तास होता. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांनी या कुत्र्याला बाहेर काढलं.
पामेरियन जातीचा हा कुत्रा अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होता.. पण त्यालाही बाहेर काढल्यावर लगेच पाणी पाजण्यात आलं आणि प्रथमोपचार करण्यात आले.
दरम्यान, डॉकयार्डमधली इमारत कोसळल्यानंतर अनेक लोकांनी या इमारतीकडे धाव घेतली. पल्लवी जाधव हिचे अश्रू तर थांबतच नाहीत. पल्लवीचे आई-वडील, भाऊ आणि वहिनी या इमारतीत रहात होते. त्यातच तिची बहीण नमिता शिंगाडे गरोदर असल्यानं माहेरी आली होती. हे सगळे जण अजून बेपत्ता आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ