लव, राजनिती और धोका

दोन वर्षापूर्वी प्रसिद्धी झोतात असलेल्या फिजाचा मृत्यू झालाय... तिच्याशी लग्न करण्यासाठी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांने चक्क धर्मांतर केलं होतं...त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती...पण फिजाच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत..

Updated: Aug 7, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com

 

दोन वर्षापूर्वी प्रसिद्धी झोतात असलेल्या फिजाचा मृत्यू झालाय... तिच्याशी लग्न करण्यासाठी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांने चक्क धर्मांतर केलं होतं...त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती...पण फिजाच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत..

 

फिजा मोहम्मद उर्फ अनुराधा बाली...एक असा चेहरा जिच्या सौंदर्याची आणि प्रेमप्रकरणाच्या किश्शांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा झालीय..तसेच प्रसार माध्यमांनीही तिला भरपूर प्रसिद्धी दिली होती...आता पुन्हा एकदा फिजा चर्चेत आलीय..पण यावेळचं कारण मोठ धक्कादायक आहे...फिजाचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यू विषयी गूढ निर्माण झालंय..

चंदीगडजवळ असलेल्या मोहालीत सेक्टर ४८ - सीमध्ये असलेलं  घर क्रमांक २१६...याच घरामध्ये फिजाचा मृतदेह आढळून आलाय...तिचं शव ज्या अवस्थेत आढळून आलं होतं ते पाहून तिच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय...फिजाचा मृत्यू का आणि कसा झाला? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत....

पण या घटनेची खबर सर्वात आधी फिजाच्या काकांना मिळाली होती... फिजाच्या काकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून त्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी तिथ फिजाचा मृतदेह आढळून आला...पोलिसांनी फिजाच्या बेडरूममध्ये प्रवेशकेला तेव्हा सकाळचे साडे नऊ वाजले होते..

फिजाचा मत्यू खून की षडयंत्र ?

या घटनेमुळे फिजाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून तिच्या मृत्यू विषयी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत..फिजाचे काका पोलिसांसमवेत जेव्हा फिजाच्या घरात गेले तेव्हा घराच्या दरवाजाला आतून कडी लावली नव्हती..

मर्डर मिस्ट्री 

घरात आणखीही कोणी होतं का ?

फिजाने मृत्यूपूर्वी दरवाजा उघडा ठेवला होता का?

फिजा कोणाची वाट पाहत होती ?

फिजाच्या घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती...तसेच तिच्या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यामुळे नाकाला रुमाल लावण्यावाचून पोलिसांसमोर दुसरा पर्याय उरला नव्हता...घरातून येत असलेली दुर्गंधी आणि मृतदेहाची अवस्था पहाता फिजाचा मृत्यू ३ - ४ दिवस आधी झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय..

 

मृतदेहची दुर्गंधी येत होती

मृतदेह अवस्था वाईट

३ - ४ दिवसांपूर्वी झाला असावा मृत्यू

 

फिजाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे..माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांच्या पासून विभक्त झाल्यानंतर ती एकटीच रहात होती..त्या एकटेपणातून तिने ते टोकाचं पाऊल उचललं असावं असाही संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.....पण कही गुपितं लपविण्यासाठी फिजाची हत्या तर करण्यात आली नाही ना ? असा सवाल उपस्थित केला जातोय..

 

 

 

जगाच्या विरोधात जाऊन फिजा आणि चाँद यांनी लग्न केलं खरं पण काही काळातच त्यांच्या प्रेमाला ग्रहण लागलं आणि त्यातूनच चंद्रमोहन फिजाला सोडून गेले..त्यानंतर ती एकटीच रहात होती...पण तिचा मृत्यू कसा ? तिने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला हे अद्यापही कोडंच आहे..

 

फिजाचा मृत्यू झालाय... जवळपास दोन वर्षापूर्वी सतत प्रसिद्धीत राहिलेली फिजाचं हे शेवटचं छायाचित्र आहे...फिजाच्या या शेवटच्या छायाचित्रामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत..

हे छाय