www.24taas.com , मुंबई
मुंबईचे डबेवाले इथल्या रोजच्या जिवनाचा एक अविभाज्य भाग बनलेत. मॅनेजमेंट गुरू म्हणून डबेवाल्यांना ओळखलं जातं. डबेवाल्याच्या या अविरत सेवेचा एल के शर्मा यांच्या 'द इंडिया आयडीया', 'हेराल्डींग द एरा ऑफ पाथ ब्रेकिंग इनोव्हेशन्स' या पुस्तकात गौरव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय़ पातळीवर दखल घेण्यात आलेल्या डबेवाल्यांच्या कार्यपद्धतीवर या पुस्तकात विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.
शुभ्र पांढरा सदरा. गळ्यात वारकरी माळ आणि डोईवर हा भला मोठा टिफीनचा रॅक. केवळ मुंबईकराचंच नाही तर सा-या जगभरात आज ही ओळख, एक व्यवसाय नाही तर ब्रॅण्ड बनलीय. आणि या अविरत सेवेचे नाव आहे, मुंबईचा डबेवाला. सतत धावत असणा-या या शहरातल्या चाकरमान्यांचा अन्नपूर्णेचा दूत म्हणजे हा मुंबईचा डबेवाला. डबेवाल्याच्या याच अविरत सेवेला एल के शर्मा यांच्या द इंडिया आयडीया, हेराल्डींग द एरा ऑफ पाथ ब्रेकिंग इनोव्हेशन्स या पुस्तकात गौरवण्यात आलयं. आंतरराष्ट्रीय़ पातळीवर दखल घेण्यात आलेल्या डबेवाल्याच्या कार्यपद्धतीवर विशेष प्रकाश टाकला आहे.
८० च्या दशकात मुंबईत बदलांना सुरुवात झाली होती. त्याच वेळी महादेव हवाजी यानी नोकरदार वर्गाला वेळेत घरचं जेवण मिळावं यासाठी डब्यांची सर्व्हीस सुरु केली. १०० माणसांच्या मदतीनं सुरु केलेल्या या व्यवसायाचा व्याप आज पाच हजार माणसांवर गेलाय. थोडीथोडकी नाही तर या शहरातले तब्बल दोन लाख नोकरदार दुपारी आपल्या घरचा घास घेतात ते केवळ याच डबेवाल्यांमुळे. त्यांच्या या सेवेला शिस्त आणि प्रामाणिकपणाची अदभूत किनार लाभलीय. त्यांच्या या मॅनेजमेंट स्किलचा फोर्ब्ज मासिकांनं दखल घेत त्यांना तारांकित दर्जा दिलाय.
एवढंच नव्हे तर आयएसओ ९००२:२००१ या आंतरराष्ट्रीय प्रमाणितांच्या कंपन्यांनीही गौरवलंय. डबेवाल्यांचा हा गौरव इथवरच थांबत नाही तर गिनीज बुकातही डबेवाल्यांच्या विक्रमाची नोंद झालीय. गळ्यातली तुळशीमाळ एवढीच त्यांना सोशल कनेक्टीव्हीटी महत्वाची वाटतेय. मात्र काळानुसार कार्यपद्धतीत आधुनिक बदलही स्वीकारलेत.
डब्यासाठी ऑनलाईन रजिस्टरची सोयही आता करुन देण्यात आलीय. असे नवे बदल स्वीकारताना, वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाची साथ न सोडणारा हा मुंबईचा डबेवालाची आता जगाचा मॅनेजमेंट गुरु अशी ओळख होतेय.
[jwplayer mediaid="25064"]