महिला बचत गटाचं 'मील्स ऑन व्हील्स'!

पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक खूशखबर आहे. हॉटेल तुमच्या दाराशी असा अनोखा प्रयोग पिंपरीत महापालिकेच्या मदतीनं करण्यात येतोय. एका डबलडेकर बसचं चक्क हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे महिला बचत गटांच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.

Updated: Mar 29, 2012, 10:33 PM IST

कैलास पुरी, 24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक खूशखबर आहे. हॉटेल तुमच्या दाराशी असा अनोखा प्रयोग पिंपरीत महापालिकेच्या मदतीनं करण्यात येतोय. एका डबलडेकर बसचं चक्क हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे महिला बचत गटांच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.

पिम्परीत लवकरच असं फिरणारं दोन मजली हॉटेल सुरू होतंय. ‘स्वामिनी महिला बचत गटा’च्या प्रयत्नांनी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. भंगारमध्ये विकायला काढलेली बस या महिला बचत गटांनी विकत घेतली आणि मील्स ऑन व्हील्स हॉटेल तयार झालं. या बसच्या खालच्या भागात किचन असणार आहे, तर वरच्या भागात ग्राहकांना बसण्याची सोय आहे.

बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळावं, यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात येतोय. स्वामिनी बचत गटाच्या या प्रयोगामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. या प्रयोगाला खवय्या पिंपरी-चिंचवडकरांचा जोरदार प्रतिसाद मिळेल असं दिसतंय.

[jwplayer mediaid="74390"]