अश्लील MMS असो किवा अश्लील चित्रफित कधी चोरी छुपे तर कधी व्यावसायिक हेतुने बनविलं जातं. या धंद्याची उलाढाल कोटीच्या घऱात असल्यामुळे हे माफिया काही ठराविक ठिकाणांना नेहमी आपल्या रडारवर घेतात आणि कोट्यवधीची कमाई करतात. अश्लील MMS किवां अश्लील विडियो चित्रफित तयार कऱण्याच्या या धंद्याची सुरवात कधी प्रेमातील विश्वासघातातून तर कधी चोरीछुप्या हा धंदा केला जातो. कधी बळजबरीने अश्लील चित्रफित तयार करुन सुड उगवण्यासाठी या अशा चित्रफितीना सार्वजनीक केल्या जाते तर कधी विकृत भावनेने चित्रीत केलेल्या या चित्रीकरणाला सार्वजनीक केल्या जाते. या धंद्याची रग्गड कमाई सुध्दा या धंद्याची व्याप्ती सांगून जाते.
गेल्या किही वर्षात या अश्लील धंद्याने असंख्य मुलींच आयुष्य उध्दवस्त केलं आहे. MMS च्या आजवरच्या इतीहासावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल, की या काळ्या धंद्याची वर्षाला कोटीच्या घरात उलाढाल असले .मात्र हा MMS किंवा अश्लील चित्रफित तयार कसा केला जातो आणि तो या काळ्या धंद्याच्या दुनियेत पोहचतो तरी कसा? हेही आता उघड होऊ लागलंय. गेल्या काही दिवसात पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत या MMSच्या काळ्या धंद्यातील काही मासे गळाला लागले आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून जी माहिती हाती लागली ती धक्कादायक आहे. सार्वजनीक ठिकाणी जिथे लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो किंवा शॉपिंग मॉल्स,रेस्टॉरेंट बाथरुम,हनीमून डेस्टीनेशन, या अशा ठिकाणी चोरीछुपे कॅमेरा लावण्यात येतो आणि त्या ठिकाणी घडणा-या महत्वाच्या खाजगी क्षणाना छुप्या कॅमेराच्या माध्यमातून कैद करण्यात येतं.आणि ह्याचीच या काळ्या धंद्यातील माफियाना गरज असते. तिथून सुरु होतो तो या काळ्या दुणीयेतील अश्लील तेचा काळा धंदा. एकदा का या माफियांच्या हातात ती चित्रफित लागली कि मग या चित्रफितला इंटरनेट,सिडी,डिव्हीडीच्या माध्यमातून सार्वजनीक करुन मोठ्या प्रंमाणात बक्कळ पैसा कमावला जातो.
मॉल्स , रुम्स आणि बाथरुम मध्ये लावले जातात कॅमेरे. ईंटरनेट कॅफेमध्ये लावण्यात येतो SPY कॅमेरे, सीडी, ब्लू-टूथ आणि इंटरनेटच्या माध्यमातून अशा अश्लील चित्रफित बाजारात पोहचविल्या जातात. बाजारात या चित्रफीतला मोठी मागणी असते. आंबटशैकीन गिऱ्हाईकांचा या अशा चित्रफितींना गराडा पडतो आणि लोकांच्या महत्वाच्या क्षणाचा आशा पध्दतीने काळाबाजार केल्या जातो. अश्लील MMS आणि अश्लील चित्रफितचा हा काळाबाजार गेल्या अनेक दिवसांपासुन राजरोसपणे सुरु आहे याला आळा घालण्याचं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय.