त्रिवेदींची शेरोशायरी ठरली 'लक्ष्य'वेधी

दिनेश त्रिवेदी यांचं पहिलचं बजेट असल्याने ते स्वत: देखील जास्तच उत्सुक होते. आणि उत्सुकतेच्या भरात त्यांनी लोकसभा भाषणात शेरोशायरी देखील पेश केली. आणि त्यांच्या याच शेरोशायरीला लोकसभेतील सगळ्याच मंत्र्यांनी दाद दिली.

Updated: Mar 14, 2012, 02:58 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचं हे पहिलेच बजेट होतं त्यामुळे त्यांच्याकडून खूपच अपेक्षा होत्या. दिनेश त्रिवेदी यांचं पहिलचं बजेट असल्याने ते स्वत: देखील जास्तच उत्सुक होते. आणि उत्सुकतेच्या भरात त्यांनी लोकसभा भाषणात शेरोशायरी देखील पेश केली. आणि त्यांच्या याच शेरोशायरीला लोकसभेतील सगळ्याच मंत्र्यांनी दाद दिली. आणि मनसोक्त आस्वाद देखील घेतला.

 

*अब तक की कामियाबी तुम्हारे नाम करता हूँ, आप सबकी लगन को सलाम करता हूँ

असं म्हणत दिनेश त्रिवेदी यांनी आपल्या बजेटला सुरवात केली, त्यात त्यांनी आतापर्यंत रेल्वेनी केलेली प्रगती आणि आतापर्यंतचे रेल्वेमंत्री यांचे आभार मानले. आणि त्याच्याप्रमाणेच काम करण्याच आश्वासन दिलं.

 

देश के रंगोंमे दौडती है रेल... देश के हर अंग मै दौडती है रेल

देशात रेल्वे सगळीकडे पोहचली आहे असं म्हणत, आता देशाला रेल्वेची गरज आहे, जर रेल्वे वाढली तर देशात वाढ होईल असं वक्तव्यच रेल्वेमंत्र्यांनी केलं. 

 

* हाथोंके लकीरोसे जिंदगी नही बनती, हमारा भी कोई हिस्सा है जिंदगी बनाने मैं 

फक्त नशीबावर विश्वास ठेऊन काहीही होत नाही, मात्र त्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि यात आपल्या प्रत्येकाचा खारीचा वाटा असला पाहिजे असं रेल्वेमंत्र्यांनी जणू सगळ्यांना उपदेश केला. 

 

जान है तो जहाँ है

आपलं जीवन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे जान असेल तरच तुम्ही सर्व काही करू शकता असं म्हणतं त्यांनी रेल्वे सुरक्षेवर जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले.

 

अशाप्रकारे नव्या रेल्वेमत्र्यांनी आपल्या खास शैलीत त्यांचा पहिला रेल्वे बजेट मांडला, पण त्याचा शेवट मात्र सगळ्यांच जरासा चटका लावून गेला हे मात्र नक्कीच.