www.24taas.com, मुंबई
रविवारी दुपारी अफगाणिस्तानातील काबूल शहर अक्षरश: हादरुन गेलं होतं...कारण तालिबान्यांनी एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवला होता..विशेषत: अमेरिका, जर्मन, ब्रिटन आणि रशियाच्या दूतावासाला त्यांनी लक्ष्य केलं होतं..बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या आवाजानं काबूल शहर दणाणून गेलं होतं....
तालिबान्यांच्या हल्ल्यामुळं रविवारी अफगाणिस्तान पुन्हा एकदा हादरुन गेलं होतं...काबूलमध्ये एकाचवेळी ठिकठिकाणी डझनभर दहशतवादी हल्ले केले गेले...
अफगाणिस्तानच्या संसंदेवर हल्ला
या हल्ल्यांची सुरुवात अफगाणिस्तानच्या संसदेपासून झाली...दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानच्या संसदेबाहेर अनेक स्फोट झाले...या हल्ल्याची माहिती मिळताच सगळीकडं एकच खळबळ उडाली...लोक जीव वाचविण्यासाठी सुरक्षीत स्थानाकडं पळत सुटले होते...सर्वत्र उडालेल्या घबराटीचा फायदा घेत तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला...मात्र दहशतवाद्यांचा तो प्रयत्न तिथ असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला...तालिबान्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी जबरदस्त फायरिंग केलं....विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या खासदारांनीही शस्त्र हाती घेऊन तालिबान्यांचा मुकाबला केला...सुरक्षा रक्षक आणि खासदारांनी प्रतिउत्तरादाखल केलेल्या गोळीबारमुळं संसदेत शिरण्य़ाचा दहशतवाद्यांचा प्रयत्न फसला..दोन्ही बाजूंनी जोरदार धुमश्चक्री सुरु होती... तालिबान्यांनी एकीकडं संसदेवर हल्ला केला होता तर त्याच वेळी दुसरीकडंही हल्ल्याच्या बातम्या येवून थडकत होत्या...
अमेरिकन दूतावासावर हल्ला
दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला चढवला होता... या दुतावासाबाहेर त्यांनी स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर त्यांनी जोरदार गोळीबार केला...या हल्ल्यानंतर अमेरिकेचं दूतावास बंद करण्यात आलं...दहशतवाद्यांनी केवळ अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला होता असं नाही तर इतर देशांच्या दूतावासांनी त्यांनी टार्गेट केलं होतं...
जर्मनी, रशिया, ब्रिटन दूतावासांवर हल्ला
दहशतवाद्यांनी जर्मन, रशिया आणि ब्रिटनच्या दूतावासावरही हल्ला चढवला होता..जर्मन दूतावासावर हल्ल्यानंतर आग लागली होती....तसेच एका उच्चपदस्थ ब्रिटिश अधिका-याच्या घरावर रॉकेटने हल्ला करण्यात आला होता.. दहशतवाद्यांनी एकाचवेळी ठिकठिकाणी हल्ला करुन काबूलमध्ये मोठी दहशत निर्माण केली होती...त्यांनी एका मोठ्या हॉटेलवर हल्ला करुन कब्जा मिळवला होता...विशेष म्हणजे हे हॉटेल अमेरिकेच्या दुतावासापासून थोड्याच अंतरावर आहे..तसेच तुर्कस्तान आणि भारतीय दूतावासही थोड्याच अंतराव आहे....दहशतवाद्यांनु नाटोच्या कार्यालयालाही टार्गेट केलं होतं...काबूलमधील नाटोच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट घडवून आणला गेला...त्यानंतर सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती..दहशतवाद्यांनी काबूलमध्ये सुनियोजन पद्धतीने ठिकठिकाणी हल्ले करुन मोठी दहशत निर्माण केला आणि त्यानंतर तालिबान्यांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्विकारली... हल्ल्याची जबाबदारी स्विकारतांना ही तर केवळ एक सुरुवात असल्याचं तालिबानने म्हटलंय... तालिबान्यांच्या या भीषण हल्ल्य़ामुळं भविष्यात अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तानलाही मोठा धोका संभवतोय..या पार्श्वभूमिवर भारतालाही अधिक सतर्क रहावं लागणार आहे..
2 मे 2011 अमेरिकेच्या कमांडोजनी कुख्यात दहशतवादी ओसामाबीन लादेनचा खातमा केला...तर 15 एप्रिल 2012ला अफगाणिस्तानच्या काबूल शहरात ठिकठिकाणी हल्ले करुन जगभर प्रचंड दहशत निर्माण केली... या दोन्ही घटनांमध्ये काही संबंधतर नाही ना अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागलीय..कारण लादेनच्या खातम्यानंतर तालिबान्यांनी केलेला हा सगळ्यात मोठा हल्ला होता...पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये दडून बसलेल्या ओसमा बीन लादेनला अमेरिकेच्या मरीन कमांडोजनी अवघ्या काही मीनिटातच यमसदनी धाडलं...त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना काबूल मध्ये हा हल्ला करण्यात आलाय... ओसमाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तालिबान्यांनी हा हल्ला तर केला नाही ना असा संशय व्यक्