चित्रा पाटील यांची गरूडझेप

एमबीए झालेल्या शेकापच्या चित्रा पाटील यांनी विक्रमी ८ हजारांचे मताधिक्य घेत जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असला तरी त्यांचा ओढा हा राजकारणात नसून समाजकारणात आहे. समाजकारण करण्यासाठी त्यांनी राजकारणाचा हाताशी पकडले आहे. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा ध्यास घेतला आहे.

Updated: Feb 24, 2012, 01:46 PM IST

www.24taas.com, अलिबाग

एमबीए झालेल्या  शेकापच्या चित्रा पाटील यांनी विक्रमी  ८ हजारांचे मताधिक्य घेत जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असला तरी त्यांचा ओढा हा राजकारणात नसून समाजकारणात आहे.  समाजकारण करण्यासाठी त्यांनी राजकारणाचा हाताशी पकडले आहे. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा  ध्यास घेतला आहे.

रायगड जिल्ह्याचील अलिबाग तालुक्यातल्या कुर्डूस मतदार संघातून कुर्डूस मतदार संघातून जवळपास आठ हजार इतक्या विक्रमी मताधिक्यानं शेकापच्या चित्रा पाटील यांनी विजय मिळवलाय. शेकापच्या आमदार मीनाक्षी पाटील यांच्या त्या स्नुषा आहे. मात्र स्वकर्तृत्वानं चित्रा पाटील यांनी राजकारणात स्थान निर्माण केले आहे, आपल्या झेप या संस्थेच्या माध्यमातून.  महिलांसाठी त्या कार्यरत आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.

कुटुंब आणि व्यवसाय सांभाळत चित्रा पाटील राजकारणात उतरल्यात. एमबीएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ग्रामीण भागातल्या महिलांच जीवनमान उंचावण्यासाठी त्या प्रयत्नशील आहे. त्यामुळं मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.

 व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="54425"]