खड्ड्याने घेतला जीव

खड्याच्या देशा असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आज महाराष्ट्रवर आली आहे. याच खड्यामुळे अनेक अपघात घडतात. अशाच एका अपघातात बदलापूरच्या डॉ. महेश पाटील यांना आपली आई गमवावी लागली. दुचाकीवरुन जात असताना गाडी खड्ड्यात आदळली आणि त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

Updated: Oct 25, 2011, 06:27 PM IST

झी 24 तास वेब टीम

 

खड्याच्या देशा असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आज महाराष्ट्रवर आली आहे. याच खड्यामुळे अनेक अपघात घडतात. अशाच एका अपघातात बदलापूरच्या डॉ. महेश पाटील यांना आपली आई गमवावी लागली. दुचाकीवरुन जात असताना गाडी खड्ड्यात आदळली आणि त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र डॉ. महेश यांच्या दुर्देवानं त्यांची इथचं पाठ सोडली नाही. पण कर्तव्यदक्ष पोलिसांनी पाटील यांच्यावरच निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचा अजब प्रकार केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑक्टोबरला डॉक्टर महेश पाटील आपल्या आईला घेऊन बुलेटवरुन बदलापूर - कटाई मार्गावरुन जात होते. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे ते चुकवित डॉक्टर महेश पुढे जात होते..वेळ सायंकळची होती... खोणी गावा जवळ त्यांची गाडी आल्यावर त्यांची बुलेट अचानकपणे रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्यातून गेली. खड्डा मोठा असल्यामुळे डॉक्टर महेश यांची बुलेट जोरात आदळली. आई बुलेटवर खाली पडली. आणि त्यात त्या जखमी झाल्या या घटनेनंतर महेश यांनी आपल्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं...पण खड्डयात बुलेट जोरात आदळण्यामुळे लतिका पाटील रस्त्य़ावर आप़टल्या होत्या..त्यामुळेच त्यांच्या डोक्याला मार लागला होता..

 

खड्ड्यामुळं डॉक्टर महेश पाटील यांना आपली आई गमवावी लागली. खऱंतर य़ा घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसला. पण मानपाडा पोलिसांनी वेगळाच तर्क मांडला. लतिका पाटील यांच्या मृत्यूसाठी त्यांचा मुलगा जबाबदार असल्याचं तर्क मांडून डॉ. महेश पाटील यांच्यावरच पोलिसांनी वाहन चालवितांना हयगय केल्याचा गुन्हा दाखल केला.

 

या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर महेश पाटील यांना फिर्यादी तसेच आरोपी केलं आहे...पण पोलिसांच्या या अजब तर्कामुळे एकच खळबळ उडाली. खरं तर ख़ड्ड्यामुळे ही घटना घ़डना घडली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन गेल्या महिन्यात राजकीय कलगितुरा रंगला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक तर या मुद्द्यावर लढवली गेली होती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वाक् युद्ध रंगलं होता. पण निव़डणूक झाल्यानंतर दोघांनाही जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसरल पडला. आणि त्यामुळेच पावसाळ्यात चार महिने कल्याण- डोंबिवलीकरांना अक्षरश: खड्यातून वाट काढावी लागली होती. पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्याचं आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आलं होतं..पण ते वास्तवात कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे...अन्यथा डॉक्टर महेश यांना जे भोगावं लागतय ते आणखी एखाद्याच्या नशिबी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.