चार दिवसांत ३८८ विद्यार्थ्यांना ४२५ नोकऱ्यांच्या ऑफर्स!

बंगळुरुच्या `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट` या `बी स्कूल`च्या यंदा बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची चांदी झालीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्ष २०१२-१४ च्या वर्गाला कॉलेज बाहेर पडल्या पडल्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पगाराच्या प्लेसमेंट मिळाल्यात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 18, 2014, 05:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
बंगळुरुच्या `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट` या `बी स्कूल`च्या यंदा बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची चांदी झालीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्ष २०१२-१४ च्या वर्गाला कॉलेज बाहेर पडल्या पडल्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पगाराच्या प्लेसमेंट मिळाल्यात.
`आयआयएमबी`च्या ३८८ विद्यार्थ्यांना तब्बल ४२५ नोकऱ्यांची ऑफर मिळाली. जवजवळ १५० कंपन्यांकडून नोकऱ्यांच्या या ऑफर्स विद्यार्थ्यांना दिलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेतर यावर्षी इंटरनॅशनल प्लेसमेंट जवळजवळ दुप्पटीनं वाढलंय. तसंच ११७ विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफरही मिळाल्यात. केवळ चार दिवसांत कॉलेज कॅम्पसमध्ये प्लेसमेंटच्या साहाय्यानं ३८८ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्यात. विद्यार्थ्यांना दरसाल १९.५ लाख रुपयांचं पॅकेज मिळाल्याचंही समजतंय.
विद्यार्थ्यांना कन्सल्टिंग सेक्टरकडून सर्वात जास्त म्हणजेच २७ टक्के नोकऱ्यांची ऑफर मिळालीय. `अॅक्सेन्चर मॅनेजमेंट कन्सल्टिंग`नं १३ ऑफर्स देऊन रिक्रूटरर्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावलाय. थर बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातून १९ टक्के, आयटी आणि टेक्नोलॉजी सेक्टरमधून १७ टक्के तर मॅनेजमेंट सेक्टरमधून १४ टक्के नोकऱ्यांच्या ऑफर मिळाल्यात.
यामध्ये, अमेझॉन, सॅमसंग, आईबीएम, कोका-कोला, पेप्सिको, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा समावेश आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.