www.24taas.com, मुंबई
सेट नेट सवलत संदर्भात राज्यभरातील प्राध्यापकांनी सरकारविरोधात आंदोलन करण्य़ाचा निर्णय़ घेतलाय, त्यामुळे लवकरच विद्यापीठांमध्ये होणा-या परीक्षांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
सेट आणि नेट परीक्षांमधून सलवत देण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे गेल्या सात महिन्यांपासून अनिर्णित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्राध्यपकांनी राज्यभरात ४ फेब्रुवारीपासून परीक्षाविषयक सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याचे ठरवलंय. महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी-मार्चपासूनच विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरु होतात. त्यामुळे या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्काराचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पेपर सेटिंगपासून थेट परिक्षा आणि उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही ठप्प होण्याची शक्यता आहे. १९९१ ते २००० याकालावधीत मान्यताप्राप्त पदांवर रूजू झालेल्या राज्यातील सहा हजारांहून अधिक प्राध्यपकांना नेट सेट पात्रतेतून वगळण्यात यावं या मागणीसाठी प्राध्यापकांचे गेल्या काही वर्षांपासून आंदोलन सुरु आहे.
गेल्या वर्षीही प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार टाकला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. १९९१ ते २००० मधील प्राध्यापकांना सेट नेट मधून सववत देण्यात यावी अशा शिफारसशीचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे.