झी २४ तास वेब टीम
विद्यार्थी मिंत्रांनो तुमच्यासाठी खास गोष्ट, खूप कमी लोकांना माहितीये की तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी गेल्यावर ते तुमच्या बायो डेटावर नजर टाकण्याआधी तुमच्यातील काही बाबी टिपण्याचा प्रयत्न करीत असतात. जास्तीत तुमच्यात गुणवत्ता आहे की नाही हे जाणण्यांचा प्रयत्न केला जातो.
आता तुम्हांला वाटेल गुणवत्ता कशी काय पारखली जाणार? तर त्यासाठी लक्षात ठेवा की तुम्हांला नोकरी मिळवून देण्यात तुमचं प्रत्येक स्किल (गुणवत्ता) महत्त्वाचं असतं. किंवा एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जात असते. त्यामुळे तुम्हांला या स्पर्धेच्या युगात टिकायचं असल्यास स्वत:च्या गुणवत्तेला वाव देण्याच काम देखील करावं लागेल. तर पाहूया या कि कोणत्या गुणवत्तेची गरज असते की जे तुम्हांला एखादी चांगली नोकरी मिळवून देऊ शकेल.
ओळख- तुम्ही जर का कुठे नोकरी मिळविण्यासाठी जात असल्यास तुम्हांला स्वत:ची नीट ओळख करून देणं गरजेचं आहे, ते पण आत्मविश्वासाने. कारण की आजच्या जमान्यात जवळजवळ ६० टक्के नोकऱ्या ह्या वशिलेबाजीनेच मिळविल्या जातात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर आपली चांगली छाप पडावी यासाठी तुम्हांला स्वत:ला नीट ओळख करून देता येणं गरजेचं आहे.
मांडणी- तुमची काय गुणवत्ता आहे, तुमचा अनूभव कितपत आहे या साऱ्यांचा एक आलेख स्वत: तयार करणं गरजेचं आहे. कारण की जर का तुम्ही तुमच्या या गोष्टी समोरच्या व्यक्ती समोर मांडू शकल्या नाहीत तर, तुमच्या गुणवत्तेचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे तुमची गुणवत्ता आणि अनुभव याची नीट मांडणी करून ते समोर मांडणे हे देखील तितकचं गरजेचं आहे.
आत्मविश्वास- जेव्हा आपण कुठे पहिल्यांदा नोकरी मिळविण्यासाठी जात असल्यास काही गोष्टी धान्यात असू द्या. एकतर समोरच्या व्यक्तीशी हात मिळविताना चेहऱ्यावर एक हास्य असण ं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दर्शीत होतो. आणि हेच जर का आपण नीटरित्या न केल्यास याचा चुकीचा समज होतो. त्यातुन तुमचा आत्मविश्वास कमी आहे असं दिसून येतं
वेळेचं महत्त्व- आपणास माहितीच आहे की जीवनात वेळेला किती महत्त्व आहे. त्यामुळे जर का आपण कुठे इंटरव्यू देण्यासाठी जाणार असल्यास वेळेवर जाणं कधीही योग्यचं त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर आपला खास प्रभाव पडतो.
ड्रेसिंग सेन्स- इंटरव्यूला जाताना अगदी योग्य प्रकारे आपला ड्रेसिंग सेन्स असावा, साधेपणा जास्तीत जास्त दिसून येईल, पण त्यातून समोरच्यावर एक प्रकारची छाप पडेल असा ड्रेस परिधान करावा.