आयसीसी क्रमवारीत विराट बनला वन डेचा किंग

आपला लाडका क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी क्रमवारीत अव्वल ठरलाय. आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर टीम इंडियाचा डॅशिंग खेळाडूनं आयसीसी बॅट्समनच्या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 6, 2014, 01:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपला लाडका क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी क्रमवारीत अव्वल ठरलाय. आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर टीम इंडियाचा डॅशिंग खेळाडूनं आयसीसी बॅट्समनच्या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
टीम इंडियाच्या रविंद्र जाडेजा हा देखील गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाच जणांमध्ये आहे. संघाच्या यादीत भारत ११२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियानं ११५ गुण मिळवत पहिलं स्थान कामय राखलंय.
बॉलर्सच्या यादीत रविंद्र जडेजा ६७६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तसंच फिरकी गोलंदाज आर. अश्विननं चौदाव्या क्रमांकावर स्थान मिळवलंय. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा चौथ्या क्रमांकावर आहे.
तर ८८१ अंकांसह विराट कोहली बॅट्समनच्या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. तर त्याच्यानंतर एबी डिव्हिलिअर्सचा नंबर आहे, त्याच्या खात्यात ८७२ अंक आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ७८३ अंकासह सहाव्या आणि शिखर धवन ७२३ अंकांसह आठव्या स्थानावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.