www.24tass.com, झी मीडिया, बुलावायो
झिम्बाव्वे दौऱ्यात यश मिळवणाऱ्या भारतीय टीममध्ये परवेज रसूलला एकाही मॅचमध्ये खेळायला न मिळणं हे दुर्भाग्यपूर्ण होतं. मात्र तरीही रसूलला बाहेर बसवण्याचा निर्णय त्यावेळी योग्य होता, असं टीमचा कप्तान विराट कोहलीला वाटतं. भविष्यात रसूलला ही संधी मिळेल अशी आशाही कोहलीनं व्यक्त केली.
जम्मू काश्मीरचा पहिला आणि ऑलराऊंडर क्रिकेटपटू परवेज रसूलची झिम्बाव्वे दौऱ्यासाठी १५ खेळाडूंच्या टीममध्ये निवड झाली. मात्र पाचही मॅचमध्ये खेळणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये रसूलचा समावेश झाला नाही. पाचही मॅचमध्ये त्याला बाहेरच बसावं लागलं. याबाबत कप्तान विराट कोहलीला विचारलं असता, ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही हे बघण्यापेक्षा जे खेळाडू दोन-तीन महिन्यांपासून बाहेर बसले होते. त्यांना संधी मिळाली हे बघावं, असं कोहली म्हणाला.
पाचही मॅचमध्ये गोलंदाजीत कोणत्याही प्रकारचा बदल न करण्याचं ठरलं होतं, असं कोहलीनं स्पष्ट केलं. शिवाय फक्त एकच मॅच खेळवण्यापेक्षा परवेजला जास्त मॅच खेळायला मिळायल्या हव्यात. त्यामुळं आगामी क्रिकेट दौऱ्यात परवेज रसूलला संधी मिळावी, अशी आशा विराट कोहलीनं व्यक्त केली. ज्या खेळाडूंना पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली त्या मोहीत शर्मा आणि जयदेव उनादकट यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं. या शब्दात कोहलीनं खेळाडूंच्या कामगिरीची स्तूती केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.