www.24taas.com, बंगळुरू
ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना प्रसार माध्यमांशी बोलण्यास बीसीसीआयनं बंदी घातलीय.
‘टीम इंडिया’ सध्या बंगळुरूच्या ‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमी’त सरावासाठी घाम गाळतेय. या सराव शिबिरा दरम्यान भारतीय खेळाडूंनी कोणत्याही प्रसार माध्यमाशी संवाद साधू नये, असे आदेश बीसीसीआयनं दिलेत.
यापूर्वी इंग्लंडविरुध्द झालेल्या मालिकेदरम्यान विराट कोहलीनं अशाच प्रकारे बीसीसीआयच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यावेळी बीसीसीआयनं त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नंतर त्याला माफी मागावी लागली.
आतादेखील, बीसीसीआयनं कडक धोरण अवलंबत खेळाडूंवर प्रसार माध्यमांशी बोलण्यास बंदी घातलीय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ फेब्रुवारीपासून चेन्नई इथं रंगणार आहे.