www.24taas.com, झी मीडिया, लंडन
चॅम्पियन्स ट्रॉफीचा जल्लोष साजरा केल्यानंतर टीम इंडिया आता एका नवीन मिशनसाठी सज्ज झालीय. टीम इंडियाने वनडे रॅंकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलयं, पण आता त्यांची खरी भिस्त असणार आहे ती हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी. इंग्लंडमध्ये विजयाचा डंका वाजवल्यानंतर आता आव्हान असणार आहे ते `ट्राय सिरीज`मध्ये कॅरेबियन भूमी गाजवण्याचं.
२८ जूनपासून वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि भारत या तीन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी टीम इंडिया जमैकाला रवाना झालीय. यासंबंधी खेळाडूंनी अनेक ट्विटस केलेत. ऑलराऊंडर रवींद्र जडेजाही या मिशनसाठी सज्ज झालाय. तो ट्विटर म्हणतोय... ‘आता जमैकाची तयारी.... आमचं पुढचं मिशन आमच्या समोर आहे. इंग्लंडमध्ये आमचा खेळ चांगलाच झाला’. ‘संघात सामील झालेल्या नवीन वेगवान गोलंदाजासोबत आता जमैकाच्या सफरीवर...’ हे ट्विट आहे आर. अश्विननचं...
सुरुवातीला २८ जून ते २ जुलैपर्यंतचे तीन सामने जमैकामध्ये खेळवण्यात येतील. त्यानंतर पाच जुलै ते अकरा जुलैदरम्यान होणारे तीन सामने त्रिनिनादमध्ये खेळवले जातील.
या टूर्नामेंटसाठी असा असेल भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद समी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अमित मिश्रा आणि आर. विनय कुमार
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.