www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखतात, ज्याच्या नावे २०० पेक्षा जास्त रेकॉर्ड आहेत तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सर्वात जास्त रन्स, सेंच्युरी, डबल सेंच्युरी, मॅच आणखीही अनेक रेकॉर्ड. मात्र एक असाही रेकॉर्ड आहे ज्यात पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी सचिनच्याही पुढं आहे.
कोणत्याही वर्षात बघून घ्याल शाहिद आफ्रिदीनं सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त सिक्सर मारले आहेत. शाहिद आफ्रिदीनं २००२मध्ये खेळल्या गेलेल्या मॅचेसमध्ये ४८ सिक्सर मारले होते. त्यावर्षी त्यानं एका वर्षात ७४३ रन्स केले. या रेकॉर्डमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर शेन वाटसन दुसऱ्या स्थानावर आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तिसऱ्या स्थानावर.
वॉटसननं २०११मध्ये ४२ सिक्सर मारले होते. त्यात मीरपूरमध्ये बांग्लादेशविरुद्ध एका इनिंगमध्ये मारलेल्या १५ सिक्सरचा समावेश आहे. सचिन तिसऱ्या स्थानावर आहे १९९८मध्ये सचिननं ४० सिक्सर मारले होते जो की एक रेकॉर्ड ठरला होता. तेव्हा सचिननं एका वर्षात १८९४ रन्स बनवले होते. सचिनचा हा रेकॉर्ड शाहिद आफ्रिदीनं २००२मध्ये ४८ सिक्सरमारून मोडला. २०११मध्ये शेन वाटसननं ४२ सिक्सर मारले होते. तर सचिननं १९९८मध्ये ४० सिक्सर मारले.
कोणत्या वर्षी कोण होतं टॉप वर
१९९८मध्ये सचिन तेंडुलकर – ४० छक्के
२००५ शाहिद आफ्रिदी – ३७ छक्के
२०००मध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली – ३५ छक्के
२००७मध्ये ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन – ३५ छक्के
२०१३मध्ये रोहित शर्मा- ३० छक्के, २००७मध्ये – ३३, २००८मध्ये- ३१ सिक्सर मारून टॉपवर होता.
२००५मध्ये महेंद्र सिंग धोनी - ३४ छक्के
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.