www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं IPLमधून रिटायर्टमेंट घेतली. वयाचं कारण पुढे करत सचिननं IPL ला अलविदा म्हटलंय. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिननं ही घोषणा केलीये.
मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या सहाव्या सीझनचं अजिंक्यपद पटकावलं. मात्र, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आयपीएलमधून आपली निवृत्ती जाहीर केली आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सचिननं निवृत्ती घेतल्यामुळे त्याचे चाहत्यांमध्ये घोर निराशा पसरली.
सचिनला आयपीएलचं अजिंक्यपद पटकावण्यासाठी तब्बल पाच वर्ष वाट बघायला लावली. मात्र, त्याच्या टीमनं अखेर विजेतेपदाला गवसणी घातली. सचिननं वन-डे आणि टेस्टमध्ये ज्याप्रकारे आपल्या बॅटिंगनं क्रिकेटप्रेमींना वेड लावलं. त्याचप्रमाणे आयपीएलमध्येही त्यानं आपल्या बॅटिंगची जादू क्रिकेटप्रेमींना दाखवली.
सचिननं IPLमधून निवृत्ती घेतली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. विशेष म्हणजे IPLच्या सहाव्या सीझनमध्ये उघडकीस आलेलं स्पॉट फिक्सींगचं प्रकरणामुळेतर सचिननं निवृत्तीचा निर्णय घेतला नाहीना अशी शंका यानिमित्तानं उपस्थित होत आहे.
२३ धावांनी चेन्नई सुपरकिंग्जवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सनं प्रथमच IPL चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं मात्र विजयाचा हा जल्लोष क्रीडा प्रेमींना फार काळ साजरा करता आला नाही. कारण क्रीकेटच्या देवानं IPLमधून निवृत्ती घेतली आणि क्रिकेटप्रेमिंना मोठा धक्काच बसला.
सचिन तेंडुलकर. आपल्या तुफान फटकेबाजीनं सा-या क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या बेताज बादशहानं रिटायरमेंटसाठी हीच वेळ योग्य असल्याचं सांगत IPLला अलविदा केलं. सचिनच्या IPL मधल्या अविस्मरणीय इंनिंग त्याच्या चाहत्यांच्या मनावर कायमच्याच कोरल्या गेल्यात... कारण मैदानात केवळ तळपणं हेच त्याच्या बॅटला ठाऊक होतं. त्यानं IPLच्या ९१ मॅचेसमध्ये २०७२७ रन्स केलेत. यात १६ हाप सेंच्यूरी आणि एका सेंच्यूरीचा समावेश आहे.. त्याच्यासाठी क्रीकेट हा केवळ खेळ नाही तर धर्मच... त्यामुळे त्यानी तो तितक्याच स्वच्छपणे जोपासला.
कोणत्याही वादंगापासून सचिन नेहमीच १०० कोस दूर राहिला म्हणूनच तो आजही त्याच्या चाहत्यांचा देव ठरलाय. मात्र राहुल द्रविड पाठोपाठ सचिननं आधी वनडे आणि आता IPL मधून घेतलेल्या निवृत्तीनं अनेक प्रश्न उपस्थीत होतायत. कारण IPLचा सहावा सिझन गाजला तो स्पॉट फिक्सींगच्या प्रकरणामुळे.
स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणात श्रीशांत अंकीत चव्हाण आणि अजीत चंडालिया यांसारख्या क्रीकेटपटूंबरोबर विंदू सारखे अभिनेते अडकले. इतकच नाही तर स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणामुळे थेट बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचं पदही धोक्यात आलं. त्यामुळे IPLला लागलेल्या या बट्ट्यामुळे तर सचिनं रिटारयमेंचा निर्णय घेतला नाहीना अशी शंका उपस्थीत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.