एक मॅच, आठ जण शतकवीर

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील गॅले टेस्ट ड्रॉ झाली असली तरी या मॅचमध्ये सेंच्युरींचा एक अनोखा विक्रम झाला..या मॅचमध्ये दोन्ही टीम्सच्या बॅट्समननी मिळून तब्बल 8 टेस्ट सेंच्युरी लगावण्याचा विक्रम केलाय..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 12, 2013, 08:19 PM IST

www.24taas.com, गाले
श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील गॅले टेस्ट ड्रॉ झाली असली तरी या मॅचमध्ये सेंच्युरींचा एक अनोखा विक्रम झाला..या मॅचमध्ये दोन्ही टीम्सच्या बॅट्समननी मिळून तब्बल 8 टेस्ट सेंच्युरी लगावण्याचा विक्रम केलाय..
श्रीलंकेच्या 5 बॅट्समननी सेंच्युरी लगावली. बांग्लादेशच्याही 3 बॅट्समननी सेंच्युरी लगावल्यात...श्रीलंकेकडून संगकारानं पहिल्या आणि दुस-या इनिंगमध्येही सेंच्युरी झळकावली तर थिरेमाने आणि चंदीमलनं पहिल्या इनिंगमध्ये आणि दिलशाननं दुस-या इनिंगमध्ये लंकेकडून सेंच्युरी झळकावली.
बांग्लादेशकडून मोहम्मद अश्रफुलनं 190 रन्सची खेळी साकारली. मुश्फिकर रहीम बांग्लादेशचा पहिला द्विशतकवीर होण्याचा पराक्रम केला. नासिर होसेननं बांग्लादेशकडून शानदार सेंच्युरी खेचली..यापूर्वी 2005 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सेंट जोन्सला झालेल्या टेस्ट मॅचमध्ये आठ सेंच्युरी लगावण्यात आल्या होत्या. महत्वाचं म्हणजे ती टेस्ट लढतही ड्रॉचं झाली होती....