टेस्ट क्रिकेट 'बॉल होणार गुलाबी'

गेल्या १३८ वर्षीची परंपरा असलेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये काही बदल होणार आहे. 

Updated: Nov 24, 2015, 06:31 PM IST
टेस्ट क्रिकेट 'बॉल होणार गुलाबी'  title=

सिडनी : गेल्या १३८ वर्षीची परंपरा असलेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये काही बदल होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या पहिल्या दिवस रात्र टेस्ट क्रिकेट मालिकामध्ये 'गुलाबी बॉलने' खेळली जाणार आहे. 

टी-२० क्रिकेट सारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये बदल करण्याची गरज आहे.  

आता टेस्ट क्रिकेटमध्ये गुलाबी बॉलचा वापर करणार आहे. यांची सुरूवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टेस्ट क्रिकेट सामन्यापासून होणार आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख जेम्स सदरलैंड यांनी असे म्हटले आहे की क्रिकेट या खेळातील सर्व फॉरमॅट मला आवडतात.

परंतु टेस्ट  क्रिकेटला अधिक मनोरंजक बनवण्याची गरज होती. यासाठी काही तरी करण्याची गरज आहे.      

आयसीसी सदस्य आणि पाकिस्तानचे बॅट्मन झहीर अब्बास यांनी ही या दिवस रात्र चालणाऱ्या निर्णयाचे असल्याचे म्हटले आहे. 

परंतु काही क्रिकेट खेळाडुंच्यामते गुलाबी बॉल लवकर खराब होऊ शकतो असे त्यामुळे त्यांना हा निर्णय चुकीचा वाटतो आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.