`जुन्या बाटलीत जुनीच वाईन आणि लेबलही जुनंच!`

बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दांत टीका केलीये. श्रीनिवासन अध्यक्ष राहिले, तर दालमिया अंतरीम अध्यक्ष कसे होऊ शकतील, असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 2, 2013, 10:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दांत टीका केलीये. श्रीनिवासन अध्यक्ष राहिले, तर दालमिया अंतरीम अध्यक्ष कसे होऊ शकतील, असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केलाय.
जुन्या बाटलीत जुनीच वाईन भरण्याचा हा प्रकार असल्याचं कीर्ती आझाद यांनी म्हटलं आहे. बीसीसीआयचे माजी पदाधिकारी जयवंत लेले यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष झाले आहेत. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे दालमिया वर्किंग कमिटीच्या ग्रुपचेही अध्यक्ष असतील. चेन्नईमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय झाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.