www.24taas.com, वेलिंग्टन
न्यूझीलंडचा बॅट्समन जेसी रायडर अखेर कोमामधून बाहेर आलाय. मात्र, कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला बारमध्ये झालेल्या मारहाणीबद्दल काहीच आठवत नसल्याचं राडरनं म्हटलंय.
रायडर वेलिंग्टन क्रिकेट टीममधील आपल्या काही मित्रांसह न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च इथल्या बारच्या परिसरात जीवघेणा हल्ला झाला होता. जबरदस्त रक्तस्राव झाल्यानं रायडर कोमात गेला होता. पण, डॉक्टरांच्या उपचारांना त्यानं चांगला प्रतिसाद दिला आणि अखेर तो कोमातून बाहेर पडलाय. आता रायडर लवकरातलवकर बरा व्हावा अशी आशा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.
दरम्यान, त्याला मारहाण केलेल्यांपैकी दोघा जणांना अटक करण्यात यश आलंय. पकडण्यात आलेल्या दोघा जणांची येत्या गुरुवारी कोर्टात सुनावणी होणार आहे.
काय घडलं होतं
बारमध्ये रायडरचा तिथल्या काही लोकांशी शाब्दिक वाद झाला होता. या वादानंतर ते लोकही निघून गेले होते. मात्र, जेव्हा रायडर बारबाहेर पडला तेव्हा बाहेर दबा धरुन बसलेल्या चार जणांच्या त्या टोळक्याने रायडरवर हल्ला केला. रायडरनं त्याचा प्रतिकार केला.मात्र चार जणांसमोर त्याचा निभाव लागू शकला नाही आणि जबर मारहाण झाल्यानं तो कोमात गेला.