पवारांना `एमसीए`च्या कामकाजापासून दूर राहण्याचे आदेश

‘एमसीए’च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. ‘एमसीए’च्या कामकाजापासून दूर राहण्याचे आदेश सत्र न्यायालयानं पवारांना दिलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 26, 2013, 07:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ‘या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयातून स्थगिती आणा, अन्यथा सत्र न्यायालयात पवारांविरुद्ध दिवाणी खटला चालवला जाईल… याचबरोबर त्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत शरद पवारांना एमसीएचं कामकाज पाहता येणार नाही’ असंही सत्र न्यायालयानं स्पष्ट केलंय. ‘या आदेशाला आठवड्याभरात उच्च न्यायालयातून स्थगिती आणा... अन्यथा पवारांविरोधात दिवाणी खटला चालवणार असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय’ त्यामुळं पवारांना तूर्त आठवडाभर एमसीएचं कामकाज पाहता येणार नाही.
मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ‘या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयातून स्थगिती आणा, अन्यथा सत्र न्यायालयात पवारांविरुद्ध दिवाणी खटला चालवला जाईल… याचबरोबर त्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत शरद पवारांना एमसीएचं कामकाज पाहता येणार नाही’ असंही सत्र न्यायालयानं स्पष्ट केलंय.
गोपीनाथ मुंडे यांनी एमसीए अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या अर्जावर बीड येथील पत्ता टाकल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. मुंडे यांच्या अर्जावर आक्षेप घेणारे सिंघवी हे एमसीए कमिटीबाहेरील असून शरद पवारच आक्षेप नोंदवू शकतात, असा युक्तिवाद मुंडेकडून केला गेला होता. ‘मी मुंबईचाच रहिवासी आहे... आणि मी माझा आयकरही मुंबईच्याच पत्त्यावर भरतो... माझ्या पासपोर्टवरदेखील मुंबईचाच पत्ता आहे... मग, माझा अर्ज बाद कसा केला जाऊ शकतो?’ असं मुंडे यांनी म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.