… अशी होते ‘एमसीए’ची निवडणूक!

‘बीसीसीआय’शी संलग्न असलेली ‘एमसीए’ ही एक खाजगी क्रिकेट संघटना आहे. तरीही या संस्थेची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेएवढीच रंगतदार ठरते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2013, 09:32 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘बीसीसीआय’शी संलग्न असलेली ‘एमसीए’ ही एक खाजगी क्रिकेट संघटना आहे. तरीही या संस्थेची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेएवढीच रंगतदार ठरते. राजकारणाव्यतिरिक्त ज्या निडणुकीची चांगलीच चर्चा रंगते ती एमसीएची निवडणूक नक्की कशी होते आणि कशाप्रकारे १७ सदस्यीय कार्यकारिणी निवडून येते हे आपण पाहूयात...
मुंबई क्रिकेट एसोसिएशची निवडणूक ही नेहमीच रंगतदार ठरते आणि ही निवडणूक नेहमीच साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरते. राजकारण्यांनाही या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्याशिवाय राहवत नाही. विधानसभा आणि लोकसभेत आकड्यांची समीकरण जुळवत सत्तेची चव चाखणाऱ्या पट्टीच्या राजकारण्यांना एमसीएमध्येही आकड्यांच गणित जुळवावच लागतं.
एमसीएमच्या अंतर्गत एकूण ३६७ क्बल्स आहेत. मात्र, यातील ३८ असोसिएट्स क्लब्सना मतदानाचा अधिकारच नाहीच. ३६७ पैकी ३२९ क्लब्सनाच मतदानाचा अधिकार आहे. ३२९ क्लब्सपैकी २११ हे मैदानी क्लब्स आहेत. तर ८१ ऑफिस क्लब्स आणि ३७ कॉलेज आणि शालेय क्लब्सचा समावेश आहे. अशी एकूण ३२९ क्बल्स एमसीएची कार्यकारिणी निवडतात.

एमसीएची कार्यकारिणी ही १७ सदस्यांची असते. यातील एक अध्यक्ष, २ उपाध्यक्ष, २ सचिव, १ खजिनदार आणि ११ व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असतात.

१७ पैकी प्रत्येक सदस्याला सर्वच्या सर्व ३२९ क्लब्सकडून प्रत्येकी एक प्रतिनिधी मतदान करतो. यातील ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तो उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात येतो.

एमसीएमध्ये सध्यस्थितीला जवळपास १५ मतदार हे कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय पक्षाचे नेते आहेत. क्लब्सचे सदस्य असलेले अनेक राजकीय नेतेही हे एमसीए निवडणुकीत लढवण्यास नेहमीच इच्छुक असतात. सध्या २००१ ते २०११ अशी जवळपास १० वर्ष एमसीची सत्ता उपभोगलेल्या शरद पवार पुन्हा एकदा ‘एमसीए’च्या अध्यक्षपदी आरूढ होण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान, एका क्बल्सचे नव्याने सदस्य बनलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एमसीएची निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. पवार म्हटलं की जवळपास सारेचजण त्यांना विनाअट पाठिंबा जाहीर करतात. यंदाही असच चित्र दिसून येत असून बाळ म्हादळकर गट आणि विजय पाटील यांच्या `क्रिकेट फर्स्ट` पॅनलने पवार यांना पाठिंबा जाहीर केला असून पवार हेच पुन्हा एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असच चित्र निर्माण झालं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.