श्रीनिवासन यांना `बीसीसीआय`चे दरवाजे खुले!

एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआय अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं त्यांना पुन्हा एकदगा अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2013, 08:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआय अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं त्यांना पुन्हा एकदगा अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय. साहजिकच, यानिर्णयामुळे श्रीनिवासन यांना दिलासा मिळालाय. परंतु सोबतच सुप्रीम कोर्टानं श्रीनिवासन यांना आयपीएल आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टानं श्रीनिवासन यांच्या जावयाची मयप्पनची आणि राज कुंद्रासहीत राजस्थान रॉयल्सच्या मालकांविरोधात सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांच्या चौकशीसाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमलीय. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकूल मुदगल यांच्या अध्य़क्षतेखाली ही समीती आपला अहवाल न्यायालयासमोर सादर करणार आहे. या त्रिसदस्यीय चौकशी समितीला चार महिन्याच्या आत तपशीलवार रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
गुरुनाथ मय्यपन याचं नाव स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पुढे आल्यानंतर श्रीनिवास यांना आयपीएलच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर बोर्डाच्या अध्यक्ष पदावर पुन्हा एकदा नियुक्ती झाल्यानंतरही न्यायालयानं त्यांना पदभार स्वीकारण्यापासून बंदी घातली होती. परंतु, आता न्यायालयानं जवळपास चार महिन्यानंतर श्रीनिवासन यांना बोर्डाची सूत्रं हाती घेण्यासाठी परवानगी दिलीय.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधी श्रीनिवासन यांना पदावर विराजमान होण्यापासून रोखण्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारनं य़ाचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.