धोनीचा रिटायरमेंट् प्लान तयार?

क्रिकेटच्या मैदानावर सध्या माहीराज सुरु आहे. कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून महेंद्रसिंग धोनी सुपरहिट ठरत असतांनाही धोनीचा रिटायरमेंट प्लॅन तयार आहे. क्रिकेटच्या पीचवर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर माहीची सेकंड इनिंग काय असणार आहे त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 4, 2013, 11:36 AM IST

www.24taas.com, मुंबई
क्रिकेटच्या मैदानावर सध्या माहीराज सुरु आहे. कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून महेंद्रसिंग धोनी सुपरहिट ठरत असतांनाही धोनीचा रिटायरमेंट प्लॅन तयार आहे. क्रिकेटच्या पीचवर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर माहीची सेकंड इनिंग काय असणार आहे त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.....
सध्याच्या घडीला भारतीय क्रीडा जगतातील हा सर्वात श्रीमंत चेहरा आहे. सगळ्या मोठा ब्रँड आहे... याच कारण म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर माहीचं मॅजिक चांगलचं चालतंय... धोनी आपल्या बॅटिंगमध्ये सुपरहिट ठरतोय.... मात्र, सगळ्यांसारखीच धोनीला आपल्या फ्यूचरची चिंता आहे. आणि म्हणूनच तयार आहे धोनीचा रिटायरमेंट प्लॅन...
धोनीचा रिटायरमेंट प्लॅन - 1
बिझनेस टायकून !

धोनी ब-याचवेळेस मोठमोठ्या ब्रँड्सचं प्रमोशन करतांना दिसतो. पैशाच्या या खेळामध्ये तो सर्वात मोठा क्रिकेटपटू आहे. क्रिकेटच्या दुनियेला अलविदा केल्यानंतर हा खेळ खेळण्याची त्यानं तयारीही केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट कंपनीचा तो वाईस प्रेसिडेंट झाला आहे. धोनीनं गेल्या वर्षी रिअल ईस्टेटच्या दुनियेत आपलं पाऊल ठेवलं होतं. मुंबईच्या एका आलिशन बिल्डिंगमघध्ये च्यानं करोडो रुपयांची इनव्हेस्टमेंट केली आहे. आणि यामध्ये त्याचा बिझनेस पार्टनर आहे तो हरभजन सिंग....

धोनीचा रिटायरमेंट प्लॅन - 2
बाईक रेसिंग टीम !

काही दिवसांपूर्वीच महेंद्रसिंग धोनीनं आपल्या छंदाचं रुपांतर सत्यात उतरवलं. बाईक रेस टीम सुरु करत त्यानं हा इशारा दिला आहे की, रेसिंगबद्दल असलेलं त्याचं प्रेम क्रिकेटमधून रिटायरमेंटनंतरही कायम राहणार आहे.
या प्रोजेक्टसह महेंद्रसिंग धोनीनं टीम इंडियाच्या इतर क्रिकेटपटूंनाही सहभागी करून घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बाईक रेसिंग स्कूल सुरु करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत.
क्रिकेटला अलविदा केल्यानंतर कॅप्टन धोनीचा रिटायरमेंट प्लॅन तयार असल्याचं यावरुन दिसून येतंय.