भारत इंग्लंडकडून ३२ रन्सनी पराभूत

महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला आज इंग्लंडविरुद्घ पराभवाला तोंड द्यावे लागले. हरमनप्रीत कौरचे धडाकेबाज शतक फुकट गेले. इंग्लं डने भारताला ३२ रन्सनी पराभूत केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2013, 04:55 PM IST

www.24taas.com,मुंबई
महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला आज इंग्लंडविरुद्घ पराभवाला तोंड द्यावे लागले. हरमनप्रीत कौरचे धडाकेबाज शतक फुकट गेले. इंग्लंडने भारताला ३२ रन्सनी पराभूत केले.
झुंजार खेळी करताना कौर १०७ रन्सवर नाबाद राहिली. भारताची आघाडीची फळी अपयशी ठरली. तसेच अखेरच्या षटकांमध्ये जास्त रन्स दिल्या. त्यामुळे भारताला पराभवाला पत्करावा लागला.
भारताची सुरूवात निराशाजनक झाली. ३ बाद २९ अशी स्थिती झाली होती. त्यानवेळी हरमनप्रीत कौर आणि करु जैन या जोडीने डाव सावरला. दोघींनी शतकी भागीदारी केली. जैनने ५६ रन्स केल्या. ही खेळी काहीशी संथ ठरली. तसेच अखेरच्या षटकांमध्‍ये हरमनप्रीतला दुस-या बाजुने साथ मिळाली नाही. इंग्लंडच्या कॅथरीन ब्रंट हीने ४ विकेट घेत भारतीय टीमला धक्का दिला.

महिला विश्वीचषक स्पलर्धेत महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने भारताला २७३ रन्सचे आव्हा‍न दिले. कर्णधार शॅरलेट एडवर्ड्सच्याय धडाकेबाज शतकाच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांमध्येर ८ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारली. तिला सारा टेलर (३५), लिडीया ग्रीनवे (२९), ऍरन ब्रिंडल (नाबाद ३७) यांनी मोलाची साथ दिली.
भारतीय गोलंदाजी निष्फळ ठरली. गोलंदाजांना रन्स रोखता आल्या नाहीत. इंग्लंडच्या डावात ३ फलंदाज रनआऊट झाल्या मुळे धावगतीला ब्रेक लागला. झुलन गोस्वाहमीने २, नागराजन निरंजना हिने २ फलंदाज बाद केले. तर गौहर सुलतानाने १ बळी घेतला.