www.24taas.com, वृत्तसंस्था, मिरपूर
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ४ एप्रिलला म्हणदे उद्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपची सेमिफायनल होणार असून त्याआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या मॅचमध्ये ज्यानं आपला फॉर्म परत मिळवला तो यूवी सेमिफायनलसाठी अनफिट ठरलाय.
टीम इंडियाचे सर्व खेळाडू मंगळवारी फुटबॉल खेळून फिटनेसचा हलकाफुलका सराव करीत होते, मात्र याचा फटका युवराज सिंगला बसला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे आणि यामुळंच त्यानं बुधवारी सरावाला दांडी मारली.
टीम इंडियाच्या १४ क्रिकेटपटूंनी बुधवारी फतुल्लाह इथल्या खान साहेब ओसमान अली स्टेडियममध्ये सराव केला. यावेळी युवराजची अनुपस्थितीत खटकणारी ठरली. यावर संघव्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा म्हणाले, युवराजची दुखापत आणखी वाढू नये यासाठी त्याला हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आता महत्त्वाच्या सेमिफायनलपूर्वी तो फिट होतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान, याआधी २००६ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये युवराजच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यावेळी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी खेळाडूंना ‘खो-खो’ करून सराव करायला सांगितला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.