www.24taas.com, नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली खबर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानी क्रिकेट टीमला भारताच्या दौऱ्याला परवानगी दिली आहे. पाच वर्षानंतर पाकिस्तानी क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. हा दौरा २२ डिसेंबर ते ७ जानेवारी या दरम्यान होणार आहे.
दोन्ही टीममध्ये तीन वनडे, आणि दोन टी-२० आतंरराष्ट्रीय मॅचची सीरिज होणार आहे. या मॅच कोलकाता, बंगळुरू, चैन्नई आणि अहमदाबाद येथे खेळविण्यात येणार आहे. या आधी दोन्ही देशांमध्ये शेवटची मॅच २००७-०८ झाली होती. त्यावेळेस एक सीरिज आयोजित करण्यात आली होती. ही सीरिज भारतातच आयोजित करण्यात आली होती.
यानंतर भारतीय टीमला २००९ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायचं होतं. मात्र २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत झालेल्या आतंकवादी हल्ला नंतर हा दौरा रद्द करण्यात आला होता. २००८ नंतर दोन्ही टीम वर्ल्डकप, चॅम्पियन ट्रॉफी आणि एशिया कपमध्ये एकमेकांसमोर आले होते.