www.24taas.com, झी मीडिया, कोची
विंडिजविरुद्धच्या पहिल्याच वन-डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय साकारत सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली विजयाचे शिल्पकार ठरले. ८६ रन्सची धुवाँधार इनिंग खेळणा-या कोहलीला `प्लेअर ऑफ द मॅच`ने गौरवण्यात आल.
कोच्ची वन-डेमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी २१२ रन्सचं टार्गेट होतं. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगला उतरलेली विंडिज टीम ४९व्या ओव्हर्समध्ये २११ रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैनाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर आर. अश्विनने २ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली. विंडिजकडून डॅरेन ब्राव्होने सर्वाधिक ५९ रन्स केल्या. जॉन्सन चार्ल्सनने ४२, मार्लन सॅम्यूएल्सने २४ आणि सिमन्सने २९ रन्स केल्या. तर ख्रिस गेल खातही न उघडता रन आऊट झाला. टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर आता तीन वन-डे सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया आतूर असेल.
दोन टेस्टच्या सीरिजमध्ये विंडिजला चारी मुंड्या चीत केल्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच वन-डेमध्ये ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. विंडिजच्या २१२ रन्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाने विडिंजवर हा विजय साकारला.
शिखर धवन ५ रन्सवर दुर्दैवाने आऊट झाल्याने टीम इंडियाला भक्कम पायाभरणी करता आली नाही. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मिळुन विंडिज बॉलर्सची चांगलीच धुलाई केली आणि दुस-या विकेटसाठी १३३ रन्सची निर्णायक पार्टनरशिप केली. रोहितने ७२ तर कोहलीने ८६रन्सची शानदार इनिंग खेळली. या दोघांच्या या खेळीमुळेच टीम इंडियाचा विजय सूकर झाला. कोहलीने तर फास्टेस्ट ५ हजार रन्सचा टप्पा ओलांडत विवियन रिचर्ड्सचा रेकॉर्डदेखील मोडित काढला. टीम इंडियाने ३६ व्या ओव्हर्समध्येच २१२ रन्सचा टप्पा पार करत ६ विकेट्सने विजय साकारला.
तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम बॅटिंगला उतरलेल्या विंडिजचा तडाखेबंद बॅट्समन ख्रिस गेल खातही न उघडता आऊट झाला. विंडिजकडून डॅरेन ब्राव्होने सर्वाधिक ५९ रन्स केल्या. भारताकडून रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैनाने प्रत्येकी ३विकेट्स घेतल्या. तीन वन-डेच्या सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतलेली टीम इंडिया आता २४ तारखेल्या विशाखापट्टणम वन-डे जिंकून सीरिजवर कब्जा करण्याच्या इ-याद्यानेच मैदानात उतरेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.