किवींना व्हाईटवॉश, भारताचा ५ गडी राखून विजय

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 3, 2012, 04:58 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.
भारताकडून विराट कोहली ५१, चेतेश्वर पुजारा ४८ आणि महेंद्र सिंग धोनी यांनी शानदार ४८ धावांची खेळी केली. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग ३८, गौतम गंभीर ३४ आणि सचिन तेंडुलकर यांनी २७ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून जितेन पटेलने ३, साऊदी आणि बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताचा निम्माच संघ १६६ धावांत तंबूत परतल्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीने किल्ला लढविला. त्यानंतर विराट कोहली आणि धोनीने संयमी खेळी करत विजयश्री साकारला.
यापूर्वी सुरेश रैनाचा शुन्याचवर त्रिफळा उडाला. त्या लाही जीतन पटेलने बाद केले. पटेलची ही तिसरी विकेट आहे. तर चेतेश्वर पुजारा 48 धावा काढून बाद झाला. जीतन पटेलने त्याची विकेट घेतली. सचिनपाठोपाठ पुजाराही बाद झाल्यामुळे भारतासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. पुजारा बाद झाला त्या वेळी विजयासाठी 103 धावांची गरज होती. डॅनियल फ्लिनने शॉर्टलेगवर अप्रतिम झेल टिपला.

सचिन तेंडुलकरचा या मालिकेत सलग तिस-यांदा त्रिफळा उडाला. दुस-या कसोटी पहिल्याव डावात जसा बाद झाला त्याथच प्रकारचा फटका खेळताना त्याचा त्रिफळा उडाला. टीम साऊथीने त्या-ची विकेट घेतली. सचिन २७ धावांवर बाद झाला. यापूर्वी २००२ मध्येर इंग्लंड दौ-यावर सलग तीन वेळा सचिन त्रिफळाचीत झाला होता. मायकल वॉन, मॅथ्यू हॉगार्ड आणि डॉमिनिक कॉर्कने त्यााचा त्रिफळा उडविला होता.

आज सकाळी विजयासाठी 261 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाला वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. परंतु, दोन्ही सलामीवीर परतले आहेत. त्या नंतर फलंदाजीस उतरलेल्यां चेतेश्वंर पुजारा आणि सचिन तेंडुलकरने सावध खेळ केला. उपहारानंतर पुजाराने धावगती वाढविली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करुन भारताला विजयाच्याी मार्गावर नेले आहे. पावसामुळे खेळ थांबला त्या वेळी भारताच्याल 2 बाद 147 धावा झाल्या होत्या .