न्यूझीलंडकडे २४४रन्सची आघाडी

चौथ्या दिवशी न्यूझीलंडचे शेपूट गुंडाळून विजयी लक्ष्य गाठण्याच आव्हान भारतासमोर असेल. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंडकडे २४४रन्सची आघाडी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 2, 2012, 06:25 PM IST

www.24ttas.com,बंगळुरू
बंगळुरू टेस्टच्या तिस-या दिवसअखेर न्यूझीलंडने ९ विकेट्स गमावत २३२ रन्स केल्या आहेत. भारताकडून आर. अश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर उमेश यादव आणि प्रग्यान ओझाने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
दिवसअखेर न्यूझीलंकडून जतिन पटेल १० रन्सवर खेळत आहे. तर ट्रेंट बाऊटने अजून खातही उघडलेल नाही. तत्पर्वी पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया ३५३ रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून कोहलीने सेंच्युरी तर धोनीने हाफ सेंच्युरी झळकावली.
आता चौथ्या दिवशी न्यूझीलंडचे शेपूट गुंडाळून विजयी लक्ष्य गाठण्याच आव्हान भारतासमोर असेल. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंडकडे २४४रन्सची आघाडी आहे.
टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन विराट कोहलीने बंगळुरू टेस्टमध्ये किवींविरूद्ध दमदार सेंच्युरी ठोकताना टेस्ट करिअरमधील दुसरी सेंच्युरी पूर्ण केली. विराट कोहलीने पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला संकटातून सावरत कॅप्टन महेंद्र सिंग धोनीसह १२२ रन्सची पार्टनरशिप केली.
विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीत तब्बल १४ फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली होती.